आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानदारासह कुटुंबातील ६ जणांची विष घेऊन आत्महत्या, अमरावती जिल्ह्यातील थरारक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी (अमरावती)- किराणा दुकान व्यावसायिक प्रफुल्ल नारायणसा चव्हाण (वय ५०) यांनी अविवाहित भाऊ, दोन बहिणी व दोन भाच्यांसह विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी उघडकीस आली. मृतांमध्ये प्रफुल्ल यांचा भाऊ विवेक नारायणसा चव्हाण (वय ३५), बहीण मंगला नारायणसा चव्हाण (वय ४०), लक्ष्मी नारायणसा चव्हाण (वय ३८), भाची कामिनी अरुणसा बारड (वय २०) व रोशनी अरुणसा बारड (वय १८) यांचा समावेश आहे. दरम्यान, चव्हाण कुटुंबीयांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचे नेमके कारण मात्र उघड होऊ शकले नाही.

अंजनगाव सुर्जी येथील काठीपुऱ्यात प्रफुल्ल नारायणसा चव्हाण यांचे किराणा दुकान आहे. प्रफुल्ल अविवाहित होते. मनोरुग्ण असलेला लहान भाऊ विवेक, अविवाहित बहीण मंगला व लक्ष्मी यांच्यासोबत ते राहत असत. दोन भाच्या कामिनी व रोशनीही लहानपणापासून त्यांच्याकडेच राहत होत्या. प्रफुल्ल यांचा मोठा भाऊ अमरावतीत राहताे. मोठ्या भावाने अनेक वेळा प्रफुल्ल यांना लग्नाविषयी म्हटले. परंतु दोन बहिणी व भाच्यांचा सांभाळ कोण करणार? या कारणामुळे ते वारंवार हा विषय टाळत असत. शेजारी व निकटवर्तीयांनीही लग्नाचा विषय काढला तर ते नकार देत असत.

दररोज सकाळी सहा वाजता दुकान उघडण्याचा चव्हाण यांचा नित्यक्रम होता. मंगळवारी मात्र दुपारपर्यंत त्यांचे दुकान व घराचे दार बंदच होते. शेजाऱ्यांनी घराचे दार ठोठावून पाहिले परंतु आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी चव्हाण यांची गावात राहणारी बहीण उषा अरुणसा बारड यांना माहिती दिली. त्या अाल्यानंतर उषा यांचा मुलगा रोशन याला कौलारू घरावर चढवण्यात अाले.

त्याने वरून घरात डाेकावून पाहिले असता सहा जणांनी अात्महत्या केल्याचे दिसून अाले. त्यामुळे तातडीने पाेलिसांना माहिती देण्यात अाली. घटनास्थळी पाेलिस अाल्यानंतर घराचे दार उघडण्यात अाले तेव्हा सहा जणांचे मृतदेह घरात पडलेले दिसले. या मृतदेहांजवळ कीटकनाशकाचा डबाही दिसून अाला. पाेलिसांनी घटनेची नाेंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
चव्हाण कुटुंबीय अबाेल, अजातशत्रू
प्रफुल्ल चव्हाण कुटुंबीय गावात शेजारी- पाजाऱ्यांशी फारसे संबंध ठेवत नसत. प्रफुल्ल हे दुकानदार असूनही ग्राहकांसोबत फारसे बोलत नसे. मितभाषी म्हणूनच त्यांची अाेळख हाेती. इतकेच काय तर त्यांचा कधीच कुणाशी वाद झाला नसल्याचे शेजारी म्हणाले. असे असताना प्रफुल्ल चव्हाण व त्यांचे कुटुंबिय इतका टोकाचा निर्णय घेऊ शकत नसल्याचेही शेजाऱ्यांचे म्हणणे अाहे. तसेच त्यांच्या अात्महत्येचे कारणही कळलेले नाही. त्यामुळे पाेलिसांसमाेर तपासाचे अाव्हान असेल.

अशी समोर आली घटना..
अल्‍पभूधारक चव्‍हाण कुटुंबिय छोटेसे किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. मात्र, मंगळवारी सकाळपासून दुकान बंद होते. कधीही बंद न राहणारे दुकान आज का उघडले नाही म्‍हणून परिसरातील लोकांनी चौकशी केली. घर उघडून पाहिले तर, घरात सहा मृतदेह आढळले. या सहाही जणांनी रात्री विष प्राषण करुन आत्‍महत्‍या केली. आज दुपारी 1.30 च्‍या सुमारास ही माहिती समोर आली आहे .
मृतांमध्‍ये..
- प्रफुल नारायण चव्‍हाण (वय 52 वर्ष)
- विवेक नारायण चव्‍हाण (वय 45)
- मंगला नारायण चव्‍हाण (वय 40)
- लक्ष्‍मी नारायण चव्‍हाण (वय 38)
- कामिनी अरूण बारड - भाची (वय 25)
- रोशणी अरुण बारड - भाची (वय 23)
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, घटनास्‍थळावरील फोटो..
सर्व फोटो - ऋषिकेश वाघमारे
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...