आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरितालिकेच्या पूजेला गेलेल्या सहा जणींचा ओढ्यात बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- हरितालिकेच्या पूजेसाठी ओढ्यावर गेलेल्या महिलेसह पाच तरुणींचा खोल खड्ड्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना नागपूरजवळ हिंगणा तालुक्यातील देवळी-सावंगी येथे रविवारी सकाळी घडली. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश देत पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी २५ हजारांची मदत दिली.

देवळी-सावंगी या दोन गावांजवळून वाहणाऱ्या ओढ्यावर गौरी धुण्यासाठी महिला गुडघाभर पाण्यात उतरल्या. अोढ्याला काही अंतरावर गेल्याच वर्षी उन्हाळ्यात बंधारा बांधला आहे. लघुसिंचन विभागाने पाण्यासाठी ओढ्यात मध्यभागी खड्डा खणला होता. मात्र, तो खड्डा महिलांच्या लक्षात आला नाही. एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात सहा जणी खोल खड्ड्यात बुडाल्या. यावेळी काठावर तुरळकच गर्दी होती. त्यामुळे कोणीही त्यांना वाचविण्यासाठी येऊ शकले नाही. जवळच खेळत असलेल्या काही मुलांनी सावंगी गावात धावतच जाऊन या घटनेची माहिती दिली.

मृतांची नावे :
मंदाताई नागोसे (४५), प्रिया रामप्रसाद राऊत (१७), जान्हवी ईश्वर चौधरी (१३), पूजा रतन डडमल (१७), पूनम तुळशीराम डडमल (१८), प्रणाली भगवान राऊत (१६).

नेमके काय झाले ?
या सहा जणी ओढ्यात उतरून स्‍नान करत होता. दरम्‍यान, बोरगाव धरणातून पाणी सोडल्याने ओढ्याला अचानक पूर आला. यात सहा जणी वाहून गेल्‍या.
बातम्या आणखी आहेत...