आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षीय बालिकेवर मावसभावाचा अत्याचार, आईस्क्रिमचे आमिष दाखवून नात्याला फासला काळिमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड -  आईस्क्रिम घेऊन देण्याच्या बाहण्याने नेऊन सहा वर्षीय बालिकेवर मावस भावानेच अत्याचार करून नात्याला काळिमा फासल्याची घटना शेंदूरजना घाट पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी घडली. पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला घटनेच्या दिवशीच त्याच्या राहत्या घरून अटक केली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. धीरज साहेबराव झोड (२२) रा. जामगाव खडका असे आरोपीचे नाव आहे.या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
 
घटनेच्या वेळी पीडित बालकेची आई वरुड येथे कार्यालयीन कामासाठी गेली होती, तर वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी दोघी बहिणी होत्या. त्याच वेळी पीडित बालिकेचा मावस भाऊ घरी आला. त्याने दोन्ही बहिणींना आईस्क्रिम खाण्यासाठी वरुड येथे जाऊ म्हणून सांगत आपल्या सोबत दुचाकीवर घेतले. 

दरम्यान तिवसा घाट परिसरात त्याने गाडी थांबवून आठ वर्षीय बहिणीला गाडीवरच बसायला सांगून पीडित बालिकेला बाजूच्या शेतात गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. याविषयी कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत दोघींनाही परत घरी आणून सोडले तो जामगाव येथे निघून गेला. दरम्यान दुपारी पीडित बालिकेची आई घरी येताच तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. या प्रकाराने घाबरलेल्या आईने त्वरित शेंदूरजना घाट पोलिस ठाणे गाठून तकार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पीएसआय आशिष गंद्रे, हे.काॅ.अतुल म्हस्के, लक्ष्मण साने करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे आता विश्वास ठेवावा तरी कुणावर असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...