आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगल वाढीसाठी राबवणार स्मृतीवन योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यासह राज्यातील जंगलाचे क्षेत्र वाढवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून याअंतर्गतच येत्या काही दिवसांत स्मृतीवन योजनाही राबवली जाणार आहे. 
कोणताही विशेष दिवस लक्षात राहावा म्हणून साधारणत: लक्षात राहील अशी किंवा उपयोगी भेटवस्तू देण्याचा पद्धत आहे. याच अनुषंगाने शासनानेही स्मृतीवन योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून लग्नाचा वाढदिवस, ज्येष्ठांचा वाढदिवस, पती, पत्नी, मुलांच्या वाढदिवशी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी शासनाद्वारे ठरवून दिलेल्या जागेत एक रोपटे लावायचे.
 
या रोपट्याच्या वाढीची अर्थात संवर्धनाची जबाबदारी त्या कुटुंबाने घ्यायची. अगदी आपल्या कुटुंबातीलच हा व्यक्ती आहे, असे समजून या रोपट्याचे जतन करायचे. त्याला ट्रीगार्ड लावून सुरक्षित करायचे, तसेच त्याच्या खत, पाण्याची सोय करायची. जर स्वत: जाता येत नसेल तर स्मृतीवनाची जबाबदारी असलेल्या संबंधिताकडे जबाबदारी सोपवायची अशी ही योजना आहे. 
 
नागरिकांमध्ये स्मृती वनाबाबत जागृती करण्याची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे सोपवली जाणार आहे. नागरिकांनी औषधी वनस्पती जसे कडूनिंब, आंबा, फणस, वड, पिंपळ, चिंच, कवठ, महारूख आदी वृक्षांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे, अशी विनंती केली जाणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची आवश्यकता आहे. अशाप्रकारे सर्वसामन्यांना वृक्षांबाबत ओढ आपण लावलेले झाड म्हणून ते त्याची काळजी घेतील. 
 
वृक्षाला देता येईल आवडीचे नाव 
पर्यावरण रक्षणासाठी उपयोगी रोपटे लावले जावे असा आग्रह केला जाणार आहे. अर्थात जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करणारे अन् कमी खर्चात तसेच देखभालीशिवाय वाढणारे एवढेच नव्हे तर दिर्घकाळ तग धरणारे झाड लावले तर त्यापासून जास्त लाभ मिळेल. विशेष बाब अशी की या झाडाला नावही देता येणार आहे. सोबतच स्मृतीवनासाठी शासनाकडून जमिनही निश्चित केली जाणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...