आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोपेत सर्पदंश,१२ वर्षीय मुलीचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी - पहाटेच्यासुमारास झोपेत असलेल्या एका १२ वर्षीय मुलीला संर्पदंश झाल्याने तिचा बुधवारी(दि. ६) सकाळी दहा वाजता नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील चिंचोली गवळी येथे घडली. सरिता भजन युवनाते असे मृतक मुलीचे नाव आहे.

तालुक्यातील चिंचोली गवळी येथील रोजंदारीचे काम करणारे भजन युवनाते हे नेहमीप्रमाणे पत्नी, दोन मुले सरितासह मंगळवारी रात्री झोपले होते.दरम्यान, बुधवारच्या पहाटे वाजताच्या सुमारास सरिताला झोपेतच सर्पदंश झाला. तिला त्वरित येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी दहा वाजता दाखल करण्यात आले. इथेही तिची प्रकृती नाजूक असल्याने येथून तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...