आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा विवाह केल्यामुळे अंत्यसंस्कारावर बहिष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगाव पेठ- पहिल्या पतीला सोडून दुसऱ्याशी लग्न केल्यानंतर समाजाने बहिष्कृत केले म्हणून आत्महत्या केलेल्या सरमेशा विकास पवार (वय ३५) या महिलेच्या अंत्यसंस्कारावर रविवारी २४ एप्रिलला पारधी समाजाने बहिष्कार घातला. ही घटना पिंपळविहीर येथे घडली. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतल्याने त्यांनाही विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. शेवटी पोलिसांच्या बंदोबस्तात त्या महिलेवर अंत्यसंस्कार झाले.

मोगरा येथील रहिवासी सरमेशा पवार (वय ३५) हिचा काही वर्षांपूर्वी गावातीलच अरूण पवार यांच्याशी विवाह झाला होता. परंतु मागील दोन महिन्यांपासून सरमेशा हिने पिंपळविहीर येथील विकास पवारशी संसार थाटला होता. दरम्यान, पारधी समाजाने तिच्यावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्काराचा त्रास तिला सहन करावा लागत होता. त्याला कंटाळून समशेराने शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील शिक्षक चंद्रकांत पवार, सहकाऱ्यांनी समशेरा हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह रविवारी पिंपळविहीर येथे आणला. परंतु समाजाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तिच्या अंत्यसंस्कारावर बहिष्कार टाकला त्यामुळे पेच निर्माण झाला. याची माहिती चंद्रकांत पवार यांनी जि. प. सदस्य विनोद डांगे यांना सांिगतली. दरम्यान, डांगे यांनी अमोल मोर्शे, बलवीर चव्हाण, नितीन सत्रे, सुनील लोहोटे यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन अंत्यसंस्काराची तयारी केली. या वेळी बंदोबस्तही ठेवला होता. दरम्यान, समशेराचे वडील पंचम भोसले, भाऊ बवरदेव भोसले यांच्या उपस्थितीत समशेरावर अंत्यसंस्कार केले. या वेळी पारधी समाजाचे नागरिक उपस्थित नव्हते.

हा प्रकार निंदनीय
समाजानेटाकलेल्याबहिष्कारामुळे महिलेला जीव गमवावा लागला. हा प्रकार निंदनीय असून, ही घटना दुर्दैवी आहे. आर. आर. जाधव, एपीआय.