आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट ‘समाजकल्याण'चा मुख्य सूत्रधार ‘भोजपुरी'चा कलाकार, लाख १० हजार रुपये जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे यांनी दाखवलेली सतर्कता त्यानंतर शहर पोलिसांच्या समयसूचक कारवाईमुळे मागील तीन महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या बनावट ‘समाजकल्याण' कार्यालयाचा शुक्रवारी पर्दाफाश झाला. या बनावट ‘समाजकल्याण'चा प्रमुख सूत्रधार संजयलाल यादव पांडे हा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रहिवासी असून, तो भोजपुरी चित्रपटांचा कलाकार असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याच्यासह अन्य एका आरोपीच्या अटकेसाठी शहर पोलिसांचे पथक शनिवार, मे रोजी उत्तर प्रदेशात रवाना झाले आहे.
शहरातील मार्डी मार्गावर मागील तीन महिन्यांपासून ‘समाजकल्याण'चे बनावट कार्यालय सुरू झाले होते. या कार्यालयात काम करण्यासाठी १० ते १२ युवक-युवती तसेच व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक कार्यरत होते. तसेच याच कार्यालयामार्फत रिक्त जागा भरण्यासाठी २९ एप्रिलला दोन वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. तब्बल हजार ३६० पदांसाठी ही भरती असून, केंद्र शासनाच्या ‘समाजकल्याण' विभागासाठी ही भरती होत असल्याचे जाहिरातीत नमूद केले होते. मात्र, अशा प्रकारे कोणतीही भरती प्रक्रिया शासन राबवत नसल्यामुळे सहायक आयुक्त, समाजकल्याण प्राजक्ता इंगळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने धाड टाकून हे कार्यालय उद‌्ध्वस्त केले. या वेळी पोलिसांनी याच कार्यालयात काम करणाऱ्या व्यवस्थापक, सहायक झोनल व्यवस्थापक, झोनल व्यवस्थापक या पदांवर काम करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. या तिघांच्या सांगण्यावरून पोलिसांनी नागपुरातील आणखी एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने दिलेल्या माहितीवरून या बनावट ‘समाजकल्याण'चा प्रमुख संजयलाल यादव पांडे असून, हा "भोजपुरी'चित्रपटांचा कलाकार आहे. त्यानेच काही महिन्यांपूर्वी नागपुरात राहणाऱ्या एका महिलेसोबत संपर्क केला. ही महिला लघुचित्रपट निर्मिती करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागपुरात यांची ओळख झाली त्यांनी सुरुवातीला "सहयोग'या सामाजिक संस्थेच्या नावावर शेतकऱ्यांसाठी एक प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकल्प राबवल्यास आपल्याला केंद्र शासनाकडून कोटी रुपये अनुदान मिळणार असल्याचे संजय पांडेने सांगितल्याचे ही महिला पोलिसांना सांगत आहे. त्याच वेळी सहयोगमध्ये काम करण्यासाठी तसेच लवकरच समाजकल्याण विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन नागपुरातील ही महिला संजय पांडे त्याचा अन्य एक सहकारी मनोज शहा यांनी शहरातील तीन युवकांना दिले. त्यामुळेच शहरात राहणारे अमोल झांबर्डे, सुमीत गेडाम आणि दीपेंद्र टावरी या तिघांनी या महिलेकडे नोकरीसाठी रक्कम दिली. या वेळी व्यवस्थापक या पदासाठी अमोल झांबर्डे याने १० लाख ३५ हजार रुपये, दीपेंद्र टावरीने लाख सुमीत गेडामने लाख रुपये दिल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

^मार्डी मार्गावरथाटलेल्या बनावट समाजकल्याण कार्यालयातील दस्तऐवज तसेच दोन आयएएस अधिकाऱ्यांचे स्वाक्षरी शिक्का असलेले काही बनावट दस्तऐवज आम्ही जप्त केले आहे. याच वेळी कार्यालयातून लाख १० हजार रुपये रोख जप्त केली. तसेच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संजय पांडे याच्या नावाने असलेले बँकेतील आठ खाती गोठवली असून, पांडे अन्य एकाच्या शोधात पथक रवाना केले आहे. संजय पांडे हा भोजपुरीचा कलाकार असल्याचेही पुढे आले आहे. लवकरच या दोघांनाही अटक करण्यात येणार आहे. दिलीप पाटील, पोलिसनिरीक्षक तथा तपास अधिकारी, गुन्हे शाखा.
संजय लाल पांडे, मुख्य सू्त्रधार

भोजपुरी कलाकार संजय पांडेचे वेगवेगळी नावे
बनावट ‘समाजकल्याण'चा प्रमुख असलेला संजय पांडे याचे वेगवेगळे नाव असून, कधी तो सुनील, कधी जितेंद्र, तर कधी संजय, असे नाव वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याने आजवर अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून, अलीकडेच त्याचा "दम है तो बिहार मे आयो'हा चित्रपट प्रकाशित झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. या कार्यालयातील अमोल, सुमीत दीपेंद्र यांनी १४ लाख ३५ हजार रुपये दिले आहे. ही रक्कम काढण्यासाठी पांडेनेच त्यांना अधिकाधिक युवकांना घेऊन या, त्यांच्याकडून जी काही रक्कम घेण्यात येईल, त्यातून ३० टक्के तुम्ही घ्या, असा सल्ला दिल्याचेही या तिघांनी पोलिसांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...