आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्ची-परशा ही लढाऊ मुले, युवांसाठी आदर्श, साेलापूरच्या प्राध्यापकाचे ‘सैराट’वर पुस्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- “सैराट’ या नागराज मंजुळेंच्या चित्रपटाने इतिहास घडवला. प्रेक्षकांना “सैराट’चा दु:खात्म शेवट तेवढा लक्षात राहतो. पण आर्ची आणि परश्याने जीवनाशी झगडत साधलेला उत्कर्ष लक्षात घ्यावा असा आहे. युवा पिढीने आर्ची आणि परश्याचा आदर्श घ्यायला हवा, हे मत आहे “सैराट’वर लिहिण्यात आलेल्या पुस्तकातले.
 
सोलापूर येथील निवृत्त प्राध्यापक विकास नागावकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील. येत्या दिवाळीत पुस्तकाचे प्रकाशन होईल, असे नागावकर यांनी सांगितले.आर्ची आणि परशाने जीवनाशी केलेला संघर्ष जगण्याचे नवे बळ देतो.  हळूहळू प्रगती करीत ते पुढे जातात, हे महत्वाचे असल्याचे नागावकर यांनी सांगितले. “सैराट’मधून नव्या पिढीने ही गोष्ट शिकायला पाहिजे. एखादी गोष्ट थोडी मनाविरूद्ध झाली तरी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग गाठणाऱ्या पिढीने आर्ची व परशाचा आदर्श घेतल्यास ते जीवनात यशस्वी होतील, हेच मी या पुस्तकातून सांगितले अाहे, असे नागावकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...