आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालखडीत साळ्याने केला जावयाचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एका३२ वर्षीय व्यक्तीचा त्याच्या साळ्याने अन्य एकाने धारदार शस्त्राने पाठीत वार करून खून केल्याची घटना नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालखडी भागात गुरूवारी (दि. १२) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. पोलिस पसार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.साबिर शाह सिकंदर शाह (३२ रा. लालखडी) असे मृतकाचे नाव आहे. 

साबिर शाह हे गुरूवारी त्यांच्या घरी आराम करत होते. त्याचवेळी त्यांचा साळा अन्य एक नातेवाईक घरात आले. यावेळी त्या दोघांनी साबिर शाहच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला. नकळतपणे झालेल्या या हल्ल्यामुळे साबिर शाह घरातच रक्तबंबाळ झालेे. परिसरातील नागरिकांनी त्यांना इर्विनमध्ये दाखल केले मात्र उपचारादरम्यान गुरूवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

दुसरीकडे ही माहिती मिळताच साबिर शाह यांचे नातेवाईक परिसरातील नागरिकांनी इर्विनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच नागपुरी गेट ठाण्यावरसुध्दा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी रवाना झाले होते. मात्र हल्ला केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. 

सहा तासांमधील दुसरी मोठी घटना: गुरूवारीदुपारी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय युवकाचा परिसरातीलच एकाने गळा चिरला होता. त्याच्यावर इर्विनमध्ये उपचार सुरूच आहे. गुरूवारी रात्री लालखडीत हा खून झाला आहे. सहा तासांमधील या दोन मोठ्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. 

पसार मारेकऱ्यांचा सर्वत्र शोध सुरू 
लालखडीमध्ये एका३२ वर्षीय व्यक्तीवर त्याच्याच साळ्याने त्याच्या एका साथीदाराने हल्ला चढवला.उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे - शिवा भगत, ठाणेदार,नागपुरी गेट.