आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्यानेच केली मुलाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - सहादिवसांपूर्वी दारूच्या सततच्या वादापायी डेहनी येथे लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पित्यानेच पोटच्या गोळ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १७) समोर आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. शैलेश गोपाल बोरकर (२५) असे मृतकाचे, तर गोपाल ज्ञानोबाजी बोरकर (४६) असे अारोपी पित्याचे नाव आहे.
शहरातील त्रिमूर्ती नगर येथील रहिवासी गोपाल बोरकर यांच्याकडे स्वतः५च्या मालकीचे अडीच एकर शेत आहे. मृतक शैलेश हा घरच्या शेतातील कुठलेही काम करत नसल्याच्या कारणावरून पिता-पुत्राचे नेहमीच खटके उडत होते. शुक्रवारी पिता-पुत्रामध्ये याच कारणावरून वाद झाला. नेहमीच्याच या वादाला कंटाळून आरोपीचा दुसरा मुलगा धनंजय पत्नी अरुणा हे दुसऱ्याच्या घरी झोपायला गेले होते, तर शैलेशला त्याचा मित्र घेऊन गेला होता. दरम्यान रात्री शैलेश घरी परतला. मनात राग धरून बसलेल्या पित्याने कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने शैलेशच्या डोक्यावर, गळ्यावर शरीरावर वार करून ठार केले. एवढेच नव्हे, तर त्याच्या अंगावर पांघरून घातले. शनिवारी दुपारी १२च्या सुमारास मृतकाच्या आईच्या ही बाब लक्षात आली. तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने भरलेली गादी, ब्लँकेट इतर साहित्य जप्त केलेे. अधिक तपास ठाणेदार दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिंदे करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...