आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागात १२ टक्के क्षेत्रावर पेरण्या, येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मान्सूनच्या नावाने ओळखल्या जोणाऱ्या जून महिन्यातच पावसाने लपंडाव चालवल्याने संपूर्ण विभागात आतापर्यंत केवळ १२ टक्के क्षेत्रावरच पेरण्या करण्यात आल्या आहे. १४ आणि १५ जूनला पावसाने हजेरी लावल्यानंतर विभागाच्या पाचही जिल्ह्यात पेरणीला सुरुवात झाली. मात्र, पाऊसच गायब झाल्याने पेरण्या थांबल्याचे चित्र निर्माण झाले. यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३५ टक्के पेरणी झाली आहे, तर त्याखालोखाल वाशीम टक्के, अकोला टक्के, अमरावती टक्के आणि बुलडाणा जिल्ह्यात टक्के पेरणी झाली आहे. विभागात एकूण १२ टक्केच पेरण्या आटोपल्या आहेत. कृषी विभागाच्या २५ जूनपर्यंतच्या साप्ताहिक अहवालात विभागातील पेरणीची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी विभागाच्या काही भागात पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे. पाचही जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली तरच पेरण्या पुन्हा जोमाने सुरू होऊ शकतील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
अपेक्षित पावसाच्या तुलनेत ७९ टक्के पाऊस :विभागात आतापर्यंत १३७.३ मिमि पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यात सरासरी १०८.३ मिमि एवढाच पाऊस कोसळला,विभागाच्या पाचही जिल्ह्यात २६ जूनपर्यंत अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या उर्वरितपान. १२ पावसाचीटक्केवारी ७८.९ टक्के एवढी आहे. यात अमरावती जिल्ह्यात ८४.३ मिमि(१०.४ टक्के) पाऊस पडला. मात्र या पावसात खंड पडल्याने पेरणी लांबली. बुलडाणा जिल्ह्यात ९४.५ मिमि( १४.२टक्के), अकोला जिल्ह्यात १११.६ मिमि(१६ टक्के) वाशीम मध्ये १२३.७मिमि(१५.५ टक्के) आणि यवतमाळात १२७.५ मिमि(१४ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आजच्या तारखेत (२६ जुन २०१५) १७२.३ मिमि एवढा पाऊस झाला होता. या वर्षी मात्र २६ जूनला १०८.३ मिमि एवढा पाऊस झाला आहे. पावसाच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत या वर्षीही झालेला पाऊस हा १४ टक्के एवढा आहे.
विभागातीलपेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र
वाशीम ४१४८०० २२९००
बुलडाणा ७४८८०० १४२००
यवतमाळ ८९७३०० ३१७३००
अकोला ४८४५०० १२५००
अमरावती ७२९८०० १४३००
एकूण ३२७५२०० ३८१२००
विभागात पावसाची आकडेवारी( मिमि)
जिल्हा -मागील वर्षीचा पाऊस -या वर्षीचा अपेक्षीत पाऊस -प्रत्यक्ष पडलेला पाऊस -आजची टक्केवारी
अमरावती-१७८.२ -१३१.४ -८४.३ -१०.४
अकोला-१५८.४ -१२१.७ -१११.६ -१६
यवतमाळ-२०२.३ -१५८.२ -१२७.५ -१४
बुलडाणा-११२.२ -१२७.४ -९४.५ -१४.२
वाशीम-२०४.१ -१४७.६ -१२३.७ -१५.५
एकुण-१७१ -१३७.३ -१०८.३ -१४.०

नागपूर पश्चिम महाराष्ट्र कोकण किनार पट्टी आणि मराठवाडयात चांगला पाऊस झाला. मात्र विदर्भात पुरेसा पाऊस झालेला नाही. या संदर्भात प्रादेशिक हवामान खात्याशी संपर्क साधला असता, आंध्र प्रदेश मध्य प्रदेशात दोन कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. परिणामी येत्या ४८ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान,पेरणी योग्य पाऊस नसल्याने पूर्व विदर्भातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाची प्रतीक्षा कायम आहे

बातम्या आणखी आहेत...