Home »Maharashtra »Vidarva »Nagpur» Sparrow Special Day

चिमणी दिन विशेष : माझ्या अंगणी ये गं चिऊ, दाणा खा! पाणी पी, भूर्रर्रर्र उडून जा!!

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 14:51 PM IST

अमरावती -चिऊताई,चिऊताई दार उघड...., ये गं चिऊ...., अशा चिऊताईच्या गोड गोष्टी ऐकत आपण सर्वच लहानाचे मोठे झालो. लहान बाळाला घास भरवताना आजी, आई, ताई हा चिऊचा घास म्हणून भरवायची. जणू ती आपल्या घरातीलच एक सदस्य आहे. पर्यावरणाच्या सुरक्षा साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या या चिमणीचे अंगण, परसातील झारावर, घराच्या ओसरीत, फोटोमागे हमखास घरटे असायचेच. पण, एव्हाना हा लहान पक्षी सिमेंटच्या जंगलात दिसेनासा झाला आहे.
ग्रामीण भागात अजूनही आढळणारी चिमणी, शहरातील इमारतींच्या जंगलात जशी लोप पावत आहे, तशीच दिवसेदिवस दिसेनाशी होत आहे. मातीची घरे आता नावाला उरली आहेत. बांबूच्या ओसऱ्या आता फारच कमी उरल्या आहेत. अंगण परसातील घनदाट झाडी, वेली, फुलांचे मळेही दिसेनासे झाले आहेत. यांच्याच आधाराने चिमण्यांची सुमारे १० वर्षांपूर्वीपर्यंत मनुष्याभोवती वागणे असायचे. मात्र आता महिन्या दोन महिन्यातून एखादवेळी एखादी चिमणी दृष्टीस पडते. त्यावेळी आपल्या मुलांना ती बघ चिमणी म्हणून एखादी दुर्मिळ गोष्टीप्रमाणे ती दाखवावी लागते.

चिऊताई बघता बघता दुर्मिळ पक्षी चिमणी बनली त्याला मनुष्यच कारणीभूत आहे. त्यामुळे या चिमण्यांसाठी दाणे असलेले दाणेपात्र, पाणी पात्र तो आवर्जून गॅलरी, घरातील एखादे मोठे झाड, गच्चीवर ठेवत आहे. परंतु, रागावलेले चिऊताई एवढ्या सहज पुन्हा आपले नाते मनुष्याशी जुळवेल असे वाटत नाही. कारण या पात्रांकडेच नव्हे तर पाणी पिण्यासाठीही ती आताशा येईनाशी झाली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, चिऊ नाही ऐतखाऊ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended