आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी आता महापालिकेतर्फे ‘विशेष बस’धावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील विद्यार्थ्यांसाठी मनपाकडून आता विशेष बस सुरु केली जाणार आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेता मनपा स्थायी समितीने हा निर्णय घेतला. महिला बस सेवेच्या धर्तीवर मनपाने ‘विद्यार्थी बस’ सुरू केली जाणार आहे.मनपा क्षेत्र अंतर्गत विविध भागातून शाळा-महाविद्यालयांत शहर बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शाळा सुरू होणे, सुटण्याच्या वेळेवर शहर बसमध्ये प्रवाशांची गर्दी राहते. अन्य प्रवाशाच्या गर्दीमुुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना शहर बस स्थानकावर ताटकळावे लागते. बडनेरा, साईनगर, गोपाल नगर, नवाथे आदी भागातून विद्यार्थी शहरातील शाळा महाविद्यालयात येतात. बडनेरा ते नवसारी, नवसारी ते बडनेरा या मार्गावर ही विशेष बस चालवली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना शहर बसचा प्रवास सुविधाजनक व्हावा,स्थानकावर ताटकळत राहण्याची वेळ येऊ नये म्हणून भाजपचे नगरसेवक तूषार भारतीय यांनी हा प्रस्ताव मांडला होता. महिलांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्याच्या उद्देशाने परिवहनने स्वतंत्र महिला बस सेवा आरंभ केली आहे. याच धर्तीवर विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी महापालिकेच्या स्थायी समितीने हा निर्णय घेतला आहे. तुषार भारतीय यांच्या प्रस्तावाला सर्वच स्थायी समिती सदस्यांनी साथ दिली. सभापती अविनाश मार्डीकर यांनी देखील यांनी देखील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता प्रस्ताव मंजूर केला. शिवाय विद्यार्थी बस तातडीने सुरू करण्याचे निर्देश कार्यशाळा विभागाला दिले. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ बडनेरा ते नवसारी दिशेने प्रवास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
सकाळी - ७.३०
सकाळी - ११.३०
सायंकाळी - ५.५०
बडनेरा ते नवसारी

विद्यार्थ्यांना लाभ
^विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी म्हणून विशेष बस सेवा सुरु करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. बडनेरा ते नवसारी, नवसारी ते बडनेरा या मार्गावर ही विशेष बस सेवा सुरू केली जाणार आहे. अविनाशमार्डीकर, सभापती स्थायी समिती
बातम्या आणखी आहेत...