आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यासाठी ‘स्पेशल’ ट्रेन, आरक्षण सुरू, प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेची तत्परता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आगामी काळात येणारे उत्सव लक्षात घेता रेल्वे विभागाने पुण्याला जाणाऱ्या प्रवाश्यांची सोय होण्यासाठी ‘हटिया -पुणे’ ही स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेची पहिली फेरी २० सप्टेंबरपासून सुरू होत असून, बडनेरा स्टेशनवर ही रेल्वे २१ सप्टेंबरला पोहचणार आहे. 
दरम्यान या रेल्वेसाठी आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. 
 
अमरावतीवरून पुणे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच दरदिवशी ३० ते ४० खासगी बसेस शहरातून पुण्याच्या दिशेने जातात, त्याव्यतिरीक्त काही रेल्वेसुध्दा आहे. मात्र रेल्वेंची संख्या मोजकी असल्यामुळे प्रवाश्यांना जागा मिळत नाही. यातही आगामी काळात गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा दिवाळीसारखे सण,उत्सव आहेत. यावेळी प्रवाश्यांची सोय व्हावी म्हणून रेल्वेने २० सप्टेंबरपासून ‘हटिया - पुणे’ ही सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
या विशेष रेल्वेच्या अकरा फेऱ्या होणार आहे. ०२८४६ हा या विशेष रेल्वेचा क्रमांक असून, ही रेल्वे २१ सप्टेंबरला दुपारी वाजून ४५ मिनीटांनी बडनेरा स्टेशनवर येणार असून मध्यरात्री वाजून ४५ मिनीटांनी पुण्यात पोहचणार आहे. 
 
१३ तास, पाच थांबे 
ही रेल्वे पुण्यात जाण्यासाठी १३ तासांचा अवधी घेणार आहे. बडनेरानंतर अकोला, भुसावळ, मनमाळ, कोपरगाव, दौंड आणि पुणे असे थांबे आहेत. 
 
प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेची तत्परता : एव्हाना भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी चांगलीच तत्पर झाली आहे. त्यामुळे अमरावती बडनेरा येथील प्रवाशांना मुंबई, पुण्याला जाण्यासाठी चांगले पर्याय उपलब्ध असतात. दिवाळीत चाकरमाने घरी परत येणार असल्यामुळे आतापासूनच दिवाळी स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली. जेणेकरून त्याना तिकीट आरक्षित करता यावे, असा रेल्वेचा मानस आहे. 
बातम्या आणखी आहेत...