आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळी सुट्यांमध्ये नागपूरहून पुणे, अमृतसरसाठी विशेष रेल्वे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- उन्हाळी सुट्यांमध्ये रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अमृतसर, पुण्यासाठी विशेष साप्ताहिक गाड्या सुरु केल्या आहेत. नागपुरातून अजनी स्थानकातून पुण्यासाठी साप्ताहिक सुपरफास्ट गाडी (२२१२४) सुरु करण्यात आली आहे. ही वातानुकुलीत गाडी १६ मे पासून प्रत्येक मंगळवारी अजनी येथून सायंकाळी ७.५० वाजता निघणार असून ती दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेबाराला पुण्याला पोहोचेल. पुण्याहून ही गाडी (२२१२३) १२ मे पासून प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता निघून पहाटे ५.१५ नागपुरात पोहोचणार आहे. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव आणि दौंड येथे थांबे राहणार आहेत. नागपुरातून अमृतसर साठी साप्ताहिक विशेष सुपरफास्ट गाडी (२२१२५) सुरु करण्यात येत आहे. ही गाडी १३ मे पासून दर शनिवारी नागपुरातून सायंकाळी ५.५० वाजता निघणार असून दुसऱ्या दिवशी रात्री ९.०५ मिनिटांनी अमृतसरला पोहोचणार आहे. तर अमृतसरहून निघणारी ही गाडी (२२१२६)१५ मे पासून दर सोमवारी पहाटे ४.१० वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे नागपुरात ४.२५ वाजता नागपुरात पोहोचणार आहे. या गाडीला भोपाळ, झांशी, ग्वाल्हेर, आगरा, नवी दिल्ली, अंबाला, लुधियाना, जलंधर हे थांबे राहणार आहेत. ही संपूर्ण गाडी वातानुकुलित आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे गाडयांचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. 
 
अमरावतीहून पुण्यासाठी विशेष साप्ताहिक सुपर फास्ट गाडी सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी १० मे २०१७ पासून दर बुधवारी पुण्याहून (२२११७) दुपारी ३.१५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी अमरावती येथे पहाटे ३.१५ वाजता पोहोचणार आहे. तर अमरावतीहून निघणारी ही गाडी (२२११८) ११ मे २०१७ पासून दर गुरुवारी सायंकाळी ६.३५ वाजता पुण्याला रवाना होणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड असे थांबे राहणार आहेत. ऐनवेळी प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांनी या विशेष रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा. तत्काळ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे, असे मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...