आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speedy Bus Hit Dump Truck, 12 Passengers Injured

भरधाव बस टिप्परवर आदळली, चालकासह १२ प्रवासी जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने येणारी एस.टी. बस पुढे अचानक थांबलेल्या टिप्परवर जाऊन आदळली. यात बसचा चालक महिला वाहकासह १२ प्रवासी जखमी झाले आहे. काहींना किरकोळ मार असल्यामुळे ते उपचाराअंती तातडीने निघून गेले. हा अपघात शुक्रवारी (दि. ४) दुपारी वाजताच्या सुमारास रहाटगाव टी पॉइंटवर घडला.

जखमी बसचालक मधुकर आनंदराव चव्हाण (५६ रा. नागपूर), बसवाहक संगीता कारिया (रा. नागपूर),पद्मा विश्वनाथ धनवंत (५४ रा. अचलपूर), संजय रामचंद्र जाेगे (३८ रा. मोझरी), कोकिळा शंकर वाकडे (६५ रा. अचलपूर), गंगूबाई प्रल्हाद नागलकर (६२ रा. अचलपूर), सुमीत देवानंद पवार (१९ रा. तिवसा), गौरव दिलीप सोनुले (१७ रा. तिवसा), करामत खान निजामत खान पठाण (५० रा. तळेगाव), सलमा करामत खान पठाण (४८), न्यामत खान बाबा खान पठाण (५२), शबाना न्यामत खान पठाण (४७ सर्व रा. तळेगाव) यांना इर्विन रुग्णालयात आणले होते. बसचालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. नागपूर आगाराची बस (एम. एच. ४० वाय ५११६) अमरावतीच्या दिशेने येत होती. ही बस रहाटगाव टी पॉइंटजवळ आली असता बसला ओव्हरटेक करून एक टिप्पर पुढे आले त्या टिप्परचालकाने अचानकपणे टिप्परचे ब्रेक लावल्याने बस टिप्परवर आदळली.