आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तूर डाळीचा दरप्रवास १५० रुपयांकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- दोनआठवड्यांपूर्वी प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर असलेली तूरडाळ आता १४० ते १४५ रुपये झाली असून, पुरेशा पावसाअभावी उत्पादनात फटका बसल्याने आगामी सणासुदीच्या काळात डाळींची दरवाढ किंवा साठेबाज कृत्रिम टंचाई करण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने पाच हजार टन डाळ आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
केंद्राने पूर्वीही उडीद आणि तूरडाळीसाठी निविदा मागवल्या हाेत्या. तसेच वाटाणा अाणि मूगडाळीसाठीही निविदा काढण्यात आल्या आहेत. तूरडाळ आयात केल्यास साठेबाजांवर दबाव येऊन दर घसरतील, असे शासनाचे मत असल्याने त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

प्रतिकूल हवामानामुळे यंदा खरीप हंगामावर विपरीत परिणाम झाला आहे. यात केवळ कडधान्यच नाही, तर सोयाबीन, मका, कापूस, भात पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच मूग, उडीद, तूर या कडधान्याच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकताे. खरेतर तूरदाळीचा निर्माता हा शेतकरीच आहे मात्र आजच्या काळामध्ये त्याच्याच मुलाला तूरदाळ मिळणे कठिण झाले आहे.
जागतिकिकरणाचा हा परिणाम समजल्या जातो. शेतकरी आपल्या शेतामध्ये तूर पिकवतो मात्र मागील काही वर्षांमध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याला तूर उत्पादन घेणे कठिण जात आहे. त्याचा गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांनी दाळीचे भाव वाढवण्यास सुरूवात करून ती आज १५० रूपये किलोवर नेवून ठेवली आहे.
असे आहेत सध्या डाळींचे दर (प्रती किलो)
तूर- १४०-१४५
मूग- १००-१२०
उडीद- ११५-१२०
चणा- ६८ -७०
मसूर- ९०

.. तर दर स्थिर राहतील
राज्यातयंदा पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्याने डाळ उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र केंद्राने डाळ आयात केली तर दर स्थिर राहतील. मात्र सध्यातरी शासनाची त्यादृष्टीने हालचाल दिसत नाही.

आणखी वाढीचा संभव
गणेशोत्सव,नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या सणांमध्ये तूरडाळीचे दर वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन घटीची शक्यता असल्याने दरात अाणखी वाढ संभवते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे.यावर उपाय करावा.
झळ महागाईची