आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात गुणी खेळाडूंची भरमार तरी सुविधांची मात्र मारामार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशराज्याला अमरावती शहर गत एका दशकांपासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरुष महिला धनुर्धर देत असतानाही येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापुढील जागेवरील अद्ययावत धनुर्विद्या केंद्राचा प्रस्ताव निधीसाठी शासनाकडे अडकून पडला आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी पुणे, दिल्ली, हरियाणा येथे जावे लागते. यात त्यांचा हकनाक वेळ पैसा खर्च होतो.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापुढे शासनाने अद्ययावत तिरंदाजी ज्युदो केंद्र उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला दिलेली २८ हजार चौ.मी.जागा गत १९ वर्षांपासून तशीच पडून अाहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून येथे धनुर्विद्या केंद्र उभारण्यासाठी अद्याप निधी मिळाला नाही. आता या जागेवर झोपड्यांचे निर्माण झाले आहे. त्यामुळे अमरावती विभागातील हजारो धनुर्धर ज्युदोपटूंवर त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाने १९९८ मध्ये जमीन उपलब्ध करून दिली. तरीही क्रीडा नगरी अशी ख्याती असलेल्या अमरावती शहरातील डीएसओ कार्यालयाला काही अडचणींमुळे बायपासला लागून असलेल्या या जमिनीचा कोणताही उपयोग करून घेता आला नाही. सध्या तेथे अनधिकृत झोपडपट्टीही वसायला लागली आहे. जर तत्काळ या जागेच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली नाही तर भविष्यात ही जागा मोकळी करून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे डीएसओंच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी आमचे कार्यालय पोलिस विभाग, तहसीलदार मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाची मदत घेणार असून, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

अमरावती शहरात सुमारे ७०० राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि विद्यापीठ स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करणारे तिरंदाज आहेत. हजारो उदयोन्मुख धनुर्धर विविध अकादमींमधून तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत अाहेत. अमरावती विभागात सुमारे पाच हजार धनुर्धर असून, ते नियमितपणे सराव करतात. मात्र, सरावासाठी हक्काचे कोणतेही ठिकाण नाही. त्यांना सातत्याने पुणे, दिल्ली, हरियाणा येथे सरावासाठी जावे लागते. शासनाची तिरंदाजी क्रीडा प्रबोधिनी अमरावतीत असली तरी ती खो-खो या खेळासाठी आरक्षित जागेवर सुरू आहे. बरे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक अंतर मिळेल एवढी जमीन येथे उपलब्ध नाही. बाजूलाच बास्केटबाॅल कोर्ट आहे. तेथील खेळाडू याच धनुर्विद्या रेंजवरून सतत जात-येत असतात. एकतर धनुर्धरांना खेळ थांबवावा लागतो किंवा बास्केटबाॅलपटूंना तरी जोवर तिरंदाज पूर्ण तीर सोडत नाहीत तोवर थांबून राहावे लागते. अशात जर एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तरही शासनालाच द्यावे लागणार आहे.

तीन कोटींचा प्रस्ताव पाठवला : तत्कालीनक्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी जागेची पाहणी करून कोटींचा प्रस्ताव पाठवला. स्वतंत्र वसतिगृह, आर्चरीचे स्वतंत्र रेंज, ज्युदो हाॅल, खानावळ, आंतरराष्ट्रीय आऊटडोअर शूटिंग रेंज उभारले जाणार आहे.

केंद्रासाठी पाठपुरावा करणार
^शासनाने धनुर्विद्या प्रबोधिनी अकादमीसाठी दिलेल्या जागेबाबत ठराव झाला आहे. डीएसओंनी प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून, त्याचा पाठिपुरावा केला जाईल. तसेच अतिक्रमण तत्काळ काढून घेतले जाईल. डाॅ.जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक.


बातम्या आणखी आहेत...