आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसआरपीएफ जवानाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यराखीव पोलिस बल गट क्रमांक ९, अमरावतीला कार्यरत असलेल्या एका ४३ वर्षीय नाईक पोलिस शिपायाने एसआरपीएफ वसाहतमधील क्वॉर्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब गुरुवारी (दि. ६) रात्री उघडकीस आली. संतोष बाजीराव प्रभे (४३) असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. प्रभे हे एसआरपीएफमध्ये पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. प्रभे एसआरपीएफच्या ज्या कंपनीमध्ये कार्यरत होते, त्या कंपनीमधील जवान सध्या कर्तव्य बजावण्यासाठी गडचिरोलीत गेलेले आहेत.

कंपनीसोबत प्रभेसुद्धा गडचिरोलीला गेले होते. मागील तीन ते चार दिवंसापूर्वीच ते रजेवर गडचिरोलीवरून अमरावतीत आले होते. क्वाॅर्टरमध्ये ते एकटेच राहत होते, त्यांच्या पत्नी मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्याकडे राहत नसल्याचे समजले आहे. दरम्यान गुरूवारी त्यांनी घरातील सिलींग फॅनला गळफास लावून घेतला. गुरूवारी रात्री त्यांच्या आई क्वाॅर्टरवर आल्या असता त्यांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. त्यामुळे तातडीने ही माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी इर्विनला पाठवला. फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बातम्या आणखी आहेत...