आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांत तिकीट चोरीने कापला सात कोटींचा खिसा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एकीकडे रस्त्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या आरामदायक खासगी बसेस प्रवाशांना खुणावत असताना दुसरीकडे एसटीचे ‘टिनपत्र्याचे’ स्वरूप बदलत नसल्यामुळे जनसामान्य प्रवाशांना खडखडाटच सहन करावा लागत आहे. त्यातच तिकीट चोरांच्या सुळसुळाटामुळे अमरावती विभागाचा चार महिन्यांत तब्बल पावणे सात कोटी रुपयांनी खिसा कापला गेल्याने प्रशासनाला जबर नुकसान सोसावे लागले आहे.
प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्यम वर्गीयांकडे आता चारचाकी वाहने आली आहेत. त्यानंतरही बहुसंख्य जनसामान्यांच्या प्रवासाची मदार एसटीच्याच भरोश्यावर आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काळ प्रचंड बदलला असला तरी खासगी बसेसच्या तुलनेत एसटीच्या सुविधेत फारसा कोणताही बदल झालेला प्रवाशांना दिसून येत नाही. महामंडळाच्या एसटीचे रुपच पालटत नसल्यामुळे सामान्य प्रवाशांना एसटीचा खडखडाट सहन करून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची संख्या प्रचंड असूनही अमरावती विभागाची तिजोरी भरत नसल्याचे चित्र असल्यामुळे सुविधांचीही मोठ्या प्रमाणात बोंब निर्माण झाली आहे. अनेक बसचे खस्ता हाल असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्पात सहन करावा लागत आहे. त्यातच एकीकडे राज्य परिवहन मंडळाला चांगले दिवस आणण्याचे गाजर दाखविले जात असताना प्रत्यक्षात अमरावती विभागाला तिकीट चोरीमुळे एप्रिल ते ३१ जुलै २०१६ या चार महिन्यांत कोटी ७१ लक्ष रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. हिच रक्कम कदाचित महामंडळाच्या तिजोरीत जमा झाली असती तर किमान काही बसमधील फाटलेल्या सीट्स तरी सुधारल्या गेल्या असत्या अशी भावना व्यक्त होत आहे.

एसटीची प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ज्यादा बस फेऱ्या सुरू करण्याची मागणीही होत आहे. मात्र तिकिटांमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे एवढा मोठा तोटा अमरावती विभागाला सहन करावा लागला आहे. यासोबतच अवैध प्रवासी (ट्रॅव्हल्स) वाहतूक, लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा अभाव, दुचाक्या, चारचाकी वाहनांची वाढलेली संख्या आदी कारणांमुळे ही एसटीला नुकसान सोसावे लागत आहे. दरम्यान, एसटीला खासगी बसची जबर स्पर्धा आहे. परंतु एसटीमध्ये अनेक उणिवा त्रुटी असल्यामुळे महामंडळ खासगी बससोबत स्पर्धा करू शकत नसल्याचे सुत्राने सांगितले. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी मिळणाऱ्या सुविधांमुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन खासगी बसने आरामदायक प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. त्यातच या सुविधा एसटीमध्ये नसून काळाच्या बदलत्या वेगाच्या तुलनेत एसटीचे चाकांची गती कासवासारखी झाली आहे. एसटी बसचा नियमानुसार ताशी वेग ८० ते ८५ कि.मी. प्रतितास असायला हवा. परंतु, एसटीकडे असलेल्या बहुतेक गाड्यांची स्थिती खिळखिळी झाल्यामुळे हा वेग प्रतितास ४० ते ५० कि.मी. प्रति तासावर येवून ठेपल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुळगुळीत सरळ रस्ता असताना देखील प्रवाशांना नागपुरात पोहोचण्यास साडेतीन ते पावणे चार तास एवढा प्रचंड अवधी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे घाईचे काम असलेले प्रवासी लांब पल्ल्यासाठी एसटीवर अजिबात विसंबून राहत नाही, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. त्यातच खिळखिळ्या झालेल्या एसटीला ‘स्पीड ब्रेक’ची खीळ घालण्यात आल्यानेही मोठे नुकसान सोसावे लागत आहे. विद्यार्थ्यांची शाळा महाविद्यालयांच्या वेळेत एसटी सोडण्याची मागणीही अमरावती एसटी परिवहन विभागाला अद्याप पूर्ण करता आली नाही. यासाठी आणखी ६० ते ७० नवीन बसेसची आवश्यकता आहे. मात्र महामंडळाच्या आर्थिक डबघाईस आलेल्या स्थितीमुळे सध्यातरी ते शक्य नसल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
असेआहेत उपाय : एसटीनेविभागात उत्पन्न वाढवण्यासाठी विना वाहक, विना थांबा बस सेवा सुरू केली आहे. सोबतच चार सात दिवसांच्या पासेस ही दिल्या जात आहेत. वर्षभरासाठी २०० रुपयांचे कॅट कार्ड काढणाऱ्या प्रवाशाला वर्षभर तिकीट दरातून १० टक्के सुट दिली जात आहे. यासह २० दिवसांचे शुल्क भरून मासिक पास, ९० दिवसांची त्रैमासिक पास, प्रवाशांना सौजन्यपूर्वक वागणूक देण्यासाठी कार्यशाळा असे उपाय केले जातात.

बहुतांश बसेस भंगारात निघण्याच्या स्थितीत : बसेसचीनोंदणी झाल्यापासून १० वर्षांपर्यंत एक बस प्रवासी वाहतुकीसाठी वापरता येते. त्यानंतर ती भंगारात काढावी लागते. अमरावती विभागातील जवळ-जवळ निम्म्या बसेसची स्थिती फारच वाईट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रवाशांनी तिकीट मागायला हवी
^एसटीला मोठ्याप्रमाणात तिकीट चोरीमुळे नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे एसटीला आपले वाहन समजून प्रवाशांनी वाहकांकडे तिकीट देण्याचा आग्रह धरायला हवा. तेव्हाच नुकसान कमी होईल. -अरुण सिया,विभागीय वाहतूक अधिकारी (अमरावती विभाग).

स्लीपर कोच येणार
अमरावती विभागाकडे सहा स्लीपर कोच येणार अाहेत. पंढरपूर, पुणे आणि भोपाळ या लांब पल्ल्यांसाठी तीन प्रवासी गाड्या जाणे-येणे करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Á एकूण चार महिन्यांचा खर्च ५८ कोटी ६७ लक्ष रु.
Á एकूण चार महिन्यांचे उत्पन्न ५१ कोटी ९६ लक्ष रु.
Á गतवर्षीच्या तुलनेमध्ये ७५.६४ लक्ष तोटा कमी
Á यापैकी डिझेलसाठी खर्च होतात १८ कोटी ५९ लक्ष रु.
Á टायरसाठी खर्च होतात कोटी ४३ लक्ष रुपये.

अमरावती विभाग एसटीची स्थिती
Áदररोजएकूण लक्ष ४८ हजार कि.मी. धावतात बसेस
Áविभागातील आगारांमध्ये ४२४ बसेस
Áआणखी हव्यात किमान ७० बसेस
Áचार महिन्यांतील तोटा कोटी ७१ लक्ष रु.
Áचार महिन्यातील प्रवासी संख्या कोटी ४१ लक्ष ३१ हजार
बातम्या आणखी आहेत...