आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वायफाय’ रोडवर धावणार आता महामंडळाची ‘लालपरी’, लांब पल्ल्याचा प्रवास होणार मनोरंजनात्मक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्मार्टयुगात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून लोकवाहिनी नावाने प्रसिद्ध महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बोस आता जिल्ह्यात “वायफाय रोड’वर धावणार आहेत. सुरुवातीला अमरावती, बडनेरा चांदूर रेल्वे या तीन आगारात असलेल्या सुमारे १६० गाड्यांमध्ये येत्या १५ ते ३० मार्चपर्यंत तर उर्वरित आगारांमध्ये टप्प्याटप्प्याने वायफाय इन्स्ट्रुमेंट लावले जाणार आहे. यामुळे स्मार्ट फोट (अॅण्ड्राॅईड मोबाईल) वापरणाऱ्या प्रवाशांना नि:शुल्क चित्रपट बघण्यासोबतच मोबाईल अप्लीकेशनही एसटी प्रवासादरम्यान वापरता येणार आहे. विशेष म्हणजे ही स्मार्ट सेवा जुन्या तिकिटामध्येच प्रवाशांना मिळणार आहे. 
 
एसटीने बहुतांश प्रवासी चटके सहन करीत जसा जमेल तसा प्रवास करीत असतात. ज्या ठिकाणी रेल्वे नाही तसेच कोणत्याही वेळेस जाणे गरजेचे असताना हमखास मिळणारे वाहन म्हणजे एसटी. यामुळे ग्रामीण भागात दूरवरही जाता येते. कारण एसटीने जिल्ह्यातील सर्वच गावे जोडली गेली आहेत. मात्र एसटीत प्रवाशांसाठी फारशा सोयी नसल्यामुळे प्रवाशांना आजवर मन मारून प्रवास करावा लागत होता. कितीही कंटाळा आला तरी घरी परत जाण्यासाठी नाईलाजाने का होईना, एसटीशिवाय पर्याय नव्हता. परंतु, आता किमान चित्रपट किंवा फोनवर वरील अप्लीकेशनचा वापर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवासात एकटेपणा जाणवणार नाही. 
 
मुंबई येथील यंत्र मीडिया सोल्युशन कंपनी सर्व बसेसमध्ये वायफाय इन्स्ट्रुमेंट बसवणार असून क्लिअरिटी कनेक्टीव्हीटी १०० टक्के राहील याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. सुरुवातीला तीन डेपोच्या १६० गाड्यांना वायफाय सुविधा दिली जाणार असून काही दिवसांनी सर्वच गाड्यांमध्ये ही सुविधा असेल. या सुविधेमुळे प्रवासी वाढतील कारण आजकाल बहुतेक प्रवाशांकडे स्मार्ट फोन असतोच. फारच कमी प्रवाशांकडे तो नसतो. त्यामुळे जर एका सीटवर एखाद्याकडे स्मार्टफोन असला तरी दुसऱ्यालाही त्यावर चित्रपट बघता येईल. मनोरंजनासोबतच प्रवास सुखकर होईल. बहुतेक लांब पल्ल्याच्या गाड्यांसह सर्व ग्रामीण भागातील गाड्यांना ही सुविधा पुरवली जाणार आहे. एक-दोन तासांचा प्रवास असेल तर मोबाईल चार्जिंगची गरज भासणार नाही.
 
मात्र तीन ते १२ तासांचा प्रवास असेल तर मोबाईल चार्ज करावा लागेल. परंतु, मोबाईल चार्जिंगची अद्याप कोणतीही सुविधा एसटीकडे नाही. यासाठी भविष्यात निश्चितपणे विचार करावा लागू शकतो. ही अडचणही लवकरच सोडवली जाईल. ही वायफाय सेवा असेल इंटरनेट नव्हे, अशी माहिती एसटीच्या विभागीय नियंत्रक विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली. 
 
सीटमागे लावणार स्टीकर: एसटीमहामंडळातर्फे याआधी रेडिओवर गाणे ऐकण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. प्रवाशांना वायफाय सुविधेचा वापर करून चित्रपट कसे बघायचे याची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक सीटच्या मागे स्टीकर लावले जाणार आहे. बसमध्ये बसल्यानंतर स्मार्टफोनवर गुगल किवी डाॅट काॅम वेबसाईट ओपन करायची. तेथे चित्रपटांची यादी मिळेल. यात सात मराठी आणि पाच हिंदी चित्रपट असतील. सोबतच कंपनीद्वारे देण्यात आलेले अप्लीकेशनही वापरता येतील. 
 
आधुनिकतेकडे एसटीची वाटचाल 
बदलत्या काळानुरुप एसटीतही बदल गरजेचा होता. प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने ई-टॅग, वायफाय या आधुनिक यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढेही काही बदल होतील. अरुणसिया, विभागीय वाहतूक अधिकारी 
 
प्रवासी वाढवाला वायफायची जोड 
एसटीने प्रवासी वाढवण्यासाठी नवे अभियान सुरू केले असून ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला वायफाय सुविधा दिली जाणार आहे. या काळात प्रवाशांची संख्या जास्त असते. तसेच सतत प्रवास करावे लागतात. प्रवास कंटाळवाणा होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे. सोबतच प्रत्येक ट्रीपमागे पाच प्रवासी वाढवण्याचे उद्दीष्टही ठेवण्यात आले आहे. ते याद्वारे पुर्ण होऊ शकते. कर्मचारी, अधिकारी, वाहक, चालक असे सर्वांनाच प्रवासी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यात पासेस, टॅग कार्ड, त्रैमासिक पासेस, वार्षिक पासेसची संख्याही वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. 
 
प्रवाशांचे मनोरंजन व्हावे हा उद्देश 
प्रवासादरम्यान एसटीत कंटाळा येऊ नये. अगदी आनंदात वेळ जावा म्हणून वायफाय कनेक्टीव्हीटीची सेवा पुरवली जात आहे. यासाठी तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. - राजेशअडोकार, विभागीय नियंत्रक 
 
>इंटरनेट कनेक्टिव्हीटीचीगरज नाही 
>१००टक्केराहणार वायफाय कनेक्टिव्हीटी 
>सर्वलांबपल्ल्याच्या गाड्यांना मिळणार सुविधा 
>ग्रामीणभागातीलगाड्यांमध्येही वापरता येणार 
>एसटीच्यातिकीटदरात मात्र होणार नाही कोणतीही वाढ 
 
बातम्या आणखी आहेत...