आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलन 19 मार्च पासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाद्वारे १९ आणि २० मार्च रोजी पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन शहरातील श्री.संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड,येथे करण्यात येत आहे. 
 
या अनुषंगाने सोमवारी मार्च रोजी प्रादेशिक उपायुक्त, (समाज कल्याण) विभाग, यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे डॉक्टर्स, शिक्षण विभागातील प्रतिनिधी, सहसंचालक(शिक्षण), तंत्र शिक्षण विभागातील अधिकारी, महाविद्यालयीन प्राचार्य, कार्यालयातील अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते. या पूर्वतयारी बैठकीमध्ये १९ २० मार्च या दोन दिवसामध्ये राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन राष्ट्रपिता महात्मा गांधी, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. 
 
या साहित्य संमेलन कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून काम करणाऱ्या संस्था कार्यकर्ते, विद्यार्थी,विद्यार्थीनी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. या सर्वांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वपूर्ण कार्यक्रम योजनांची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे. या अनुषंगाने तज्ञ व्यक्तींच्या सहभागासह विविध प्रबोधनात्मक चर्चासत्र तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विभागामार्फत करण्यात आले आहे. 
 
यावर्षी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन १९ आणि २० रोजी आयोजित करण्याचा मान अमरावती शहराला लाभला आहे. याअनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून १९-२० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती कार्यक्रमाकरिता भव्य दिंडीचे आयोजन, प्रदर्शन, संमेलनाचे उद्घाटन, २०१६-१७ या वर्षाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण, चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्थांनी, युवक, युवतींनी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावतीचे डी.आर. वडकुते यांनी केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...