आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State In English Schools In Question Solution Priority: CM

राज्यातील इंग्रजी शाळांचे प्रश्न प्राधान्याने साेडवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘राज्यातीलइंग्रजी शाळांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेताहेत. त्या शाळांचे प्रश्न सोडवणे सरकारचे कर्तव्य असून निश्चितपणे महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या (मेस्टा) माध्यमातून मांडलेले प्रश्न सकारात्मकपणे सोडवता येतील,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.

‘मेटा’तर्फे इंग्रजी शाळा संस्थाचालकांच्या पहिल्या राज्यव्यापी महामेळाव्याच्या उद््घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील‘मेस्टा’चे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे, महासचिव राजेंद्र दायमा, मराठवाडा अध्यक्ष भरत भांदरगे आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्याने सातत्याने मराठी शाळांना प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्रात मराठीचे शिक्षण मिळालेच पाहिजे, यावर शासनाचा भर आहे, परंतु आता इंग्रजीच्या माध्यमातून संधी प्राप्त होत आहेत. रोजगार, तंत्रज्ञान, विज्ञान शिक्षणाकरिता इंग्रजीचे शिक्षण अधोरेखित होत आहे. त्यामुळे पालकांचा कलही इंग्रजी शिक्षणाकडे वाढला आहे. मातृभाषेतून संस्कार, संस्कृती रुजवली जाते, तर इंग्रजीमुळे विचार जगासमोर नेता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीचे शिक्षण घ्यावे,’ असेही ते म्हणाले.

अाचारसंहिता संपताच बैठक
‘मेस्टा’च्यामाध्यमातून मांडलेले प्रश्न निवडणूक आचारसंहितेनंतर राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करून सकारात्मकपणे सोडवण्यात येतील. तसेच शिक्षण शुल्क आणि शिक्षण हक्क कायद्याबाबत संघटनेच्या काही सूचना असतील, त्यावरही योग्य विचार करण्यात येईल. शासन पारदर्शी प्रशासनासाठी कटिबद्ध असून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांंनी सांगितले.