आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय बास्केटबाॅल स्पर्धा ९०० खेळाडू गाजवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातील ९०० अग्रणी खेळाडू अंबानगरीतील अद्ययावत कोर्टवर शनिवार २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आयोजित राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत राहणार आहेत. क्रीडा युवक सेवा संचालनालांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अन् जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त सहकार्याने विभागीय क्रीडा संकुलातील कोर्टवर आयोजित या स्पर्धेत मुले मुलींच्या १४, १७ १९ वर्षांखालील वयोगटात लढती रंगतील.या स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय बास्केटबाॅल स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार आहे. आजवर मुंबई, पुणे तसेच नागपूर या महानगरांमध्ये राज्य शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन होत होते. आता मात्र अंबानगरीत ही या स्पर्धा आयोजनासाठी उत्तम सोयी उपलब्ध असल्यामुळे या क्रीडा नगरीलाही आयोजनपद देण्यात आले आहे. राज्यभरातून स्पर्धेसाठी पंच येणार असून, त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा बास्केटबाॅल संघटनेचे अध्यक्ष आमदार डाॅ. सुनील देशमुख, सचिव जयंत देशमुख, क्रीडा अधिकारी अनिल बोरवार, संजय कथळकर, भास्कर घटाळे, प्रशिक्षक हेमंत लोखंडे, दिलीप वाठ तसेच इतर या स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. खेळाडूंच्या राहण्याची सोय शहरातील उत्तम हाॅटेल, महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आली आहे.
उद्घाटन विभागीय क्रीडा संकुलात
स्पर्धेचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर सभागृहात होणार असून, याप्रसंगी खासदार आनंद अडसूळ, आमदार डाॅ. सुनील देशमुख, डाॅ. अनिल बोंडे, आमदार बच्चू कडू, अॅड. यशोमती ठाकूर, रवि राणा, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सेलिब्रेटिंची मुलेही खेळणार
राज्य बास्केटबाॅल स्पर्धेत सेलिब्रेटिंची मुलेही सहभागी होणार आहेत. यात ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा, उद्योगपती राहुल बजाज यांचा नातू सहभागी होणार आहेत. बजाज यांचा नातू त्याच्या ३० सहकाऱ्यांसह विमानाने तेथून अमरावतीत स्पर्धेत खेळण्यासाठी येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...