आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

600 photographers नी दाखवला निसर्ग, पाहा राज्‍यस्‍तरीय छायाचित्र प्रदर्शनातील 20 फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर्स असोसिएशन व अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्‍या संयुक्त विद्यमाने राज्‍यस्‍तरीय छायाचित्र स्‍पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. 24 ते 26 सप्‍टेंबर या कालावधित संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या आर्ट गॅलरीमध्ये हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन भरवण्‍यात आले आहे. राज्‍यभरातील तब्‍बल 600 छायाचित्रकारांनी निसर्गावर आधारीत छायाचित्रे या प्रदर्शनात सादर केले आहेत. तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी पहिल्‍याच दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती.
दोन गटात स्‍पर्धा-
हौशी आणि व्यावसायिक असे दोन गट तयार करून ही स्‍पर्धा घेण्‍यात आली आहे. त्‍यासाठी निसर्ग हा स्पर्धेचा प्रमुख विषय ठरवण्‍यात आला होता. या दोन गटातून प्रत्‍येकी तीन स्‍पर्धक विजेते म्‍हणून निवडल्‍या जातील. अंबानगरीफोटो-व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष वैभव दलाल यांनी divyamarathi.com ला स्‍पर्धेसंदर्भात माहिती दिली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, या राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेतील निवडक 20 फोटो..
बातम्या आणखी आहेत...