आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Pravin Pote Comment On Fire Brigade In MIDC

सर्वच एमआयडीसीत स्वतंत्र अग्निशमन दल, प्रवीण पोटे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये (एमआयडीसी) आता स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा लवकरच उभारण्यात येईल, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी दिली. नांदगाव पेठ पंचतारांकीत एमआयडीसीत ऐन दिवाळीच्या दिवशी आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोटे यांनी ही माहिती दिली.

एमआयडीसीमध्ये अनेक उद्योगांमध्ये विविध कारणामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे उद्योजकांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते. भविष्यात अशा आगींच्या घटनांवर त्वरीत नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा एका वर्षांच्या आत उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऐन दिवाळीच्या दिवशी नांदगाव पेठ पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत मोहित प्लॅस्टिक कारखान्याला आग लागली. या आगीच्या घटनेचा आढावा उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांनी घेतला. आगीत मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने विशेषकरून नवउद्योजकांचे मनोधर्य खचून जाते. आग लागल्यावर अग्निश्मन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत नाही, असा नेहमीचा अनुभव आहे. या सर्व घटनांचा आढावा घेतला असता एमआयडीसीसाठी एक स्वंतत्र व त्वरीत आगीच्या ठिकाणी पोहचणाऱ्या अग्नीशमन यंत्रणेची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी मंत्रालयीन पातळीवर उद्योग विभागाच्याकडून कृती आराखाडा करण्याचे आदेश पोटे यांनी संबधित यंत्रणेला दिल्याचे सूत्रांनी या वेळी बोलताना सांगितले.