आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाचा टक्का वाढण्यास हातभार लावा, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारीया यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी साधला संवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कमी असलेली मतदानाची टक्केवारी वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलंग्नित महाविद्यालयांमधील रासेयो कार्यक्रम अधिकारी, नोडल अधिकारी, प्राचार्य तथा विद्यार्थ्यांशी निवडणूक आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे शनिवारी (दि.७ ) संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले. 

अमरावती अकोला महानगरपालिका तसेच अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांसाठीच्या मतदार नोंदणीची प्रक्रिया आटोपली असून आता मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी सगळ्यांना पाऊले उचलावी लागणार आहे. 

चांगले उमेदवार निवडणूक येण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविणे आवश्यक असून यामध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी महत्वाची भूमिका बजावणे गरजेचे असल्याचे निवडणूक आयुक्त सहारीया बोलताना म्हणाले. रॅली, मानवी, श्रृखंला, प्रतिज्ञा, पथनाट्य, महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंम्मेलने, सोशल मिडीया, राष्ट्रीय सेवा योजना या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चितपणे मदत होईल, असेही सहारीया म्हणाले. 

या कॉन्फरसींग दरम्यान कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, राज्य निवडणूक आयोग सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, अमरावती जिल्हाधिकारी किरण गिते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, यवतमाळचे जिल्हाधिकारी रवींद्र प्रतापसिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, महापालिका आयुक्त हेमंत पवार, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, अमरावती पोलीस अधीक्षक लखमी गौतम, संगणक केंद्र प्रमुख डॉ. डी. के. जोशी, यंत्रणा विश्लेषक डॉ. नितीन कोळी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. गणेश मालटे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, सहा. कुलसचिव संजय येरंडे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे शैलजा वाघ यांच्यासह पाचही जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. 

चार जिल्ह्यांशी संपर्क 
विद्यापीठसंगणक केंद्रातील व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे अमरावती हव्याप्र मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, अकोला , बुलडाणा जिल्ह्यातील चिखली , शेगाव येथील माहुली ग्रुप ऑफ इंस्टिटट्युशन्स, यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथे उपस्थित सर्वांशी त्यांनी संवाद साधला. 
बातम्या आणखी आहेत...