आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या मुलांची चमकदार कामगिरी, फडणवीस, सरसंघचालक भागवतांची उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पारंगत व स्नातकोत्तर पशुवैद्यक विज्ञान या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक मूल्यांक मिळविल्याबद्दल परभणी येथील पशुवैद्यक व पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी देबी प्रसाद मिश्रा याला तर पशू पोषण आहारशास्त्र विषयात सर्वाधिक मूल्यांक मिळविल्याबद्दल चंद्रकांत भाले यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.   

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारी वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिदेशक डाॅ. त्रिलोचन महापात्र आदींची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभावर विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी पदके मिळवित आपली छाप सोडली.   
 
विद्यापीठाच्या स्नातक पशुवैद्यक विज्ञान व पशुसंवर्धन या पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक मूल्यांक मिळविल्याबद्दल उदगीर येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या परमेश्वर सुनील पालमाटे याचा डाॅ. व्ही. बी. हुकेरी व डाॅ. एस. आर. कुमठेकर सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. याच महाविद्यालयातील आनंद राजशेखर दडके यालाही डाॅ. एस. आर. कुमठेकर सुवर्णपदक तसेच डाॅ. ए. एस. कैकिणी स्मरणार्थ रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातील परमेश्वर एकनाथ काटे याला महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ सुवर्णपदक, कै. सुधाकरराव नाईक व गुरुवर्य नारायणराव बाजड स्मृती सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले, तर याच महाविद्यालयाच्या प्रमोद भिवसेन तांबडे यालाही महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ सुवर्णपदक, कै. सुधाकरराव नाईक सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले, तर अमित मधुकर चिलबुले याला गुरुवर्य नारायणराव बाजड स्मृती सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमास  अनेक मान्यवर, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची उपस्थिती होती. 
 
सरसंघचालकांना ‘डाॅक्टर आॅफ सायन्स’
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारी वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. या समारंभात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘डाॅक्टर आॅफ सायन्स’ ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली. एकेकाळी या व्यवसायातील लोकांना तसेच विद्यापीठाच्या पदवीला फारशी मान्यता व प्रतिष्ठा नव्हती. परंतु आज चित्र बदलले आहे. आज या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यामुळे आपल्या वाढत्या प्रतिष्ठेला अनुकूल संशोधन करून विद्यार्थी व संशाेधकांनी नवनवीन शोध लावायला हवे, असे भागवत म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...