आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक डाॅ. नाईकची बाजू घेणाऱ्यांवर देशद्रोह लावा : भाजपचे अामदार अनिल गाेटे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : दहशतवादी संघटनांशी संबंधांचा अाराेप असलेला वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक डाॅ. झाकीर नाईकची बाजू घेणाऱ्यांवर देशद्राेहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे अामदार अनिल गाेटे यांनी शुक्रवारी अाैचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मांडली.
समाजवादी पक्षाचे अामदार अबू अाझमी यांनी गुरुवारी विधानसभेत नाईकच्या संस्थेवरील बंदी मागे घेण्याचा मुद्दा उपस्थित केला हाेता.
त्याला गाेेटे यांनी तीव्र अाक्षेप नाेंदवला हाेता. त्यावरून अाझमी व गाेटे यांच्यात अाधी सभागृहात व नंतर बाहेरही खडाजंगी झाली हाेती. या विषयाचे पडसाद शुक्रवारीही उमटले.

अतिरेकी अबू अालमला नाईकने ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली हाेती. तसेच त्याच्या संस्थेला परदेशातून ६० काेटींची देणगी मिळाल्याचेही समाेर अाल्याचे गोटे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...