आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिज कम बंधाऱ्याची डागडुजी, ३५० विहिरींत साचले पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - िजल्हा परिषद लघु सिंचन विभागाने १९९९ मध्ये बांधलेला पूल कम बंधारा तीन-चार वर्षांनंतर बंद पडला. जलयुक्त शिवार योजनेत या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली. त्याचा लाभ आता ७ किमी परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. दुरुस्तीपूर्वी ७० हेक्टरची सिंचन क्षमता आता २५० हेक्टर झाली आहे. शासकीय यंत्रणेने सकारात्मकनेते केलेल्या प्रयत्नांतून चांगले काम उभे राहिले आहे. लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश गिरी, काटोलचे उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले.

नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कळंबा येथे १९९९ मध्ये हा पूल कम बंधारा बांधण्यात आला होता. दहा लाख रूपये खर्चून लांडगी नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १५० सहस्र घटमीटर हाेती. पहिल्या वर्षी लघु सिंचन विभागातर्फे साठवणूक करण्यात आली. २००० मध्ये बंधारा ग्राम पंचायतकडे देखभाल-दुरूस्तीसह हस्तांतरीत करण्यात आला. पुढे तीन वर्षे पाणी साठले. २००४ पासून बंधारा नादुरूस्त होता. बंधाऱ्यात पोस्ट मान्सून फ्लोमध्ये लोखंडी पाट्या टाकून पाणी अडवले जायचे. दगडी बांधकामातील बंधाऱ्याच्या पायव्यामधून पाण्याचा झिरपा व्हायचा तसेच कधी गावकरी लोखंडी पाट्या काढून टाकायचे. बंधाऱ्याच्या वरील बाजूला नाला पात्रात गावाला लागणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहेत. कळंभा व मोहखेडी या दोन गावांना या विहिरीतून पाणी पुरवठा होत असे. परंतु बंधाऱ्यात पाणी साठा होत नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात बंधाऱ्याची दुरूस्ती करण्यात आली. यात बंधाऱ्याच्या स्लॅबला लोखंडी कठडे लावण्यात आले. जीर्ण लोखंडी पाट्या बदलण्यात आल्या. तसेच ३ मीटर लांबीचा रस्ता वाढवून चार मीटरचा करण्यात आला. बंधाऱ्यापासून गोदी-दिग्रस या तीन किमी नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरणही करण्यात आले. यातून २ लाख क्यूबीक मीटर माती काढण्यात आली.

पैशाचीही बचत
बंधाऱ्याच्या कामात पैशाचीही बचत करण्यात आली. दुरूस्तीसाठी २४.९४ लाख अंदाज पत्रक असताना प्रत्यक्षात २०.४८ लाखात काम पूर्ण झाले. स्लॅब, दगडी पीचींग व प्लॅस्टरिंगसाठी ११.१३ लाखांऐवजी ९.६७ लाख लागले तर नाला खोलीकरण व रूंदीकरण ९०.९८ लाखांऐवजी ८१.८६ लाखांत करण्यात आले. १२७.०५ लाख इस्टीमेट असताना ११२.०१ लाखांत काम पूर्ण झाले.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...