आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा दणाणून सोडणार्‍या जांबुवंतराव यांना बाळासाहेब ठाकरे संबोधत \'विदर्भाचा सिंह\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/मुंबई- स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही धोटेंनी आक्रमकपणे मांडले. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी उचलून धरणाऱ्या जांबुवंतरावांना ‘विदर्भवीर’ असेही संबोधले जात‍ होते. त्यांच्या निधनाने विदर्भावर शोककळा पसरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जांबुवंतराव यांना 'विदर्भाचा सिंह' संबोधत होते.

धोंटेंच्‍या संघर्षाला तोड नाही..
आयुष्याच्या सुरुवातीच्‍या काळात राजकारणात असताना धोटे यांनी जो संघर्ष केला त्‍याला तोड नाही. आयुष्यातील उमेदीची अनेक वर्षे त्‍यांनी त्‍याग केला. जनआंदोलने उभारली, तुरुंगाची हवा, पोलिसांच्या लाठ्या खाल्‍या. विदर्भाच्या इतिहासात त्‍याच्‍या नेतृत्‍वाला तोड नाही. मात्र, जनतेही या वाघाला डोक्‍यावर घेतले होते. ते जेथे उभे राहत तेथून लाखभर मतं घेत एवढी लोकप्रियता त्‍यांनी मिळवली होती. शंभर वर्षात विदर्भात कुण्‍या नेत्‍याच्‍या वाट्याला येणार नाही एवढे प्रेम त्‍यांना मिळाले.

हा ‘सिंह’ यापुढे दहाडणार नाही
विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी यापुढे जाहीरसभेत बोलणार नसल्याची घोषणा नवराज्य निर्माण महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अमरावतीत नुकतीच केली होती. महाराष्ट्राने केलेल्या दुजाभावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडलेल्या शेतकऱ्यांना धोटे ते ‘हुतात्मा’ म्‍हणाले. गेली कित्येक दशके विदर्भ दणाणून सोडणारा ‘सिंह’ यापुढे दहाडणार नाही, हे ऐकून अनेकांना धक्काच बसला होता.

एकेकाळी अशी होती ओळख..
एकेकाळी विदर्भाचा ‘शेर’, एक झंझावात, एक वादळ, एक तुफान, एक धगधगती अंगार अशा विशेषणांनी जांबुवंतराव धोटे या व्‍यक्‍तिमत्‍वाचा परिचय होत असे. मात्र, काळानुसार इतिहास बदलतो. हे वादळही हळूहळू शांत होत गेलं.

बाळासाहेब म्‍हणाले होते, विदर्भाचा सिंह..
मुंबईतील एका कार्यक्रमात जांबुवंतराव धोटे आणि बाळासाहेब ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. त्‍यावेळी 'विदर्भाच्या ‘सिंहा’ची मुंबईच्या वाघाला साथ’ असे स्वत: बाळासाहेब म्‍हणाले होते. ही घटना वृत्तपत्रांचे मथळे झाली होती. यावरून धोटे यांच्‍या झुंजार व्यक्तिमत्त्वाची कल्पना करता येईल.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, जांबुवंतराव धोटे यांचे तरूणपणीचे फोटो.. वाचा,

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...