आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Happy B\'day : कधी शोले स्टाइल तर कधी भीक मांगो, अनोखी असतात बच्चू कडूंची आंदोलने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन बसेसच्‍या मागणीसाठी बस रोको. - Divya Marathi
नवीन बसेसच्‍या मागणीसाठी बस रोको.
अमरावती - जिल्‍ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे महाराष्‍ट्रात त्‍यांच्‍या अनोख्‍या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्‍यांची प्रश्‍न सोडवणा-या आमदारांचा चा चाहता वर्गही मोठा आहे. बच्चू कडू यांचा आज वाढदिवस. यानिमित्त आम्ही या पॅकेजच्या माध्यमातून वाचकांना बच्चू कडू यांच्या काही अनोख्‍या आंदोलनांविषयी माहिती घेऊन आलो आहोत.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्‍या काळात त्‍यांनी ‘शोले’ चित्रपटातील वीरूसारखे पाण्याच्या टाकीवर चढून शेतक-यांच्या मागण्‍यांसाठी ‘शोले’ स्‍टाईल आंदोलन केले होते. अंध अपंग व सर्वसामान्‍यांच्‍या प्रश्‍नांसाठी बैलगाडी मोर्चा, अपंग बेरोजगारांसाठीचे डेरा आंदोलन, कधी आपल्या समर्थकांसोबत स्वत:ला बसमध्ये कोंडून घेऊन, अधिका-याच्‍या खुर्चीला फुलमाळा चढवून, तर कधी थेट जिल्‍हाधिका-यांच्‍या दालनात आठ- दहा साप सोडून केलेली अनोखे आंदोलनामुळे बच्चू कडू नेहमी चर्चेत राहिले आहेत.

आक्रमक संघटना 'प्रहार'
युवकांच्‍या संघटनासाठी आमदार बच्‍चू कडू यांनी प्रहार युवा संघटनेची स्‍थापना केली. या माध्यमातून त्‍यांनी स्थानिक प्रश्‍न आक्रमकपणे समोर आणले आहेत.
सामान्‍यांना आपला वाटणारा माणूस आमदार बच्‍चू कडू यांचा चाहता वर्ग महाराष्‍ट्रातील विविध शहरांमध्‍ये आहे. गोरगरीब लोक त्‍यांना आपला आधार मानतात. म्‍हणून त्‍यांच्‍या आंदोलनाला प्रतिसादही भक्‍कम असतो.

2011 सालीही कडू यांनी मंत्रालयातील आरोग्य विभागातील कर्मचा-याला 40 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर मंत्रालयातील सर्व कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरु केले. तसेच कडू यांच्याविरोधात अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आमदार बच्चू कडू यांच्या अनोख्या आणि गाजलेल्या आंदोलनाचे फोटो..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...