आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमप्रकरण, कायदेशीर गुंत्यातून भर रस्त्यात गळा चिरून युवतीचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या कायदेशीर वैयक्तीक गुंतागुंतीतून प्रतीक्षा मुरलीधर मेहत्रे (वय २४) रा. छाबडा प्लॉट या तरुणीचा युवकाने भरदिवसा चाकूने गंभीर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी भरदुपारी साडेबारा वाजता साईनगर परिसरात घडली. मारेकरी म्हणून राहुल बबनराव भड (वय २५) रा. मुदलियारनगर याचे नाव समोर आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून त्याचा शोध घेतला जात आहे. 


प्रतीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन करून त्या दुचाकीने परतत होत्या. त्याचवेळी मागून दुचाकी घेऊन राहुल भड आला. राहुलने प्रतीक्षाच्या दुचाकीला धक्का मारून दुचाकी उभी करायला सांगितली. त्यामुळे दुचाकी थांबवून प्रतीक्षा उभी होती. त्याचवेळी राहुलने त्याच्या बॅगमधून चाकू काढून प्रतीक्षाच्या गळ्यावर, छातीवर पोटावर वार केले. त्यानंतर राहुल घटनास्थळावरून पसार झाला. श्वेताने आरडाओरड केल्यामुळे नागरिकांंनी प्रतीक्षाला गंभीर अवस्थेत इर्विन रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्रतीक्षाला मृत घाेषित केले. 


प्रतीक्षा आणि राहुल यांचे चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेम संबंध होते. यातूनच त्यांचा कायदेशीर वादही मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. एप्रिल महिन्यात कौटुंबिक न्यायालयात राहुलने याचिका दाखल करून प्रतीक्षा पत्नी असून ती नांदायला तयार नाही, अशी याचिका दाखल केली होती. मात्र प्रतीक्षाच्या वडिलांनी तसेच तिच्या वकिलांनी सांगितले की, प्रतीक्षाचे राहुलसोबत लग्न झालेच नव्हते. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. नंतर त्या मागे घेण्यासही ते तयार झाले होते. मात्र राहुलने आज डाव साधला. त्याच्या शोधासाठी अकोला, अमरावती शहरात पथके रवाना झाली आहेत. 


प्रतीक्षा होती ‘एमएससी’
प्रतीक्षाचेवडील मुरलीधरराव मेहत्रे यांचे राजेंद्र कॉलनी परिसरात इलेक्ट्रिकल दुरुस्ती विक्रीचे दुकान आहे. सर्वसामान्य कुटुंबातील प्रतीक्षा अभ्यासात हुशार होती. तिने बुद्धिमत्तेच्या जोरावरच ‘एमएससी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र गुरुवारी राहुलने या गुणी तरुणीचे सर्वस्व संपवून टाकले, असा आक्रोश घटनेनंतर प्रतीक्षाचे निकटवर्तीय करत होते. 


मार्च महिन्यात राहुलने घातली होती लग्नाची मागणी
प्रतिक्षासोबतलग्न करण्याची मागणी घालण्यासाठी मार्च महिन्यात राहुल त्याच्या नातेवाइकांना घेऊन प्रतीक्षाच्या घरी गेला होता. मात्र, त्यावेळी प्रतीक्षाच्या कुटुंबीयांनी राहुलला लग्नासाठी नकार दिला होता. त्यानंतर पुढच्याच महिन्यात राहुलने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करून प्रतीक्षा आपली रितसर पत्नी असून तिने नांदण्यासाठी यावे, असा अर्ज दाखल केला होता. 


पोलिसांनी जप्त केले लग्नाचे प्रमाणपत्र 
याघटनेनंतर पोलिसांनी राहुलच्या एका नातेवाइकाकडून राहुल प्रतीक्षाच्या लग्नाचे प्रमाणपत्र जप्त केले आहे. मात्र ते प्रमाणपत्र कुणी दिले, त्यांचे लग्न कधी झाले. त्यावर असलेला मजकूर नेमका काय आहे, याची पोलिसांनी पडताळणी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...