आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा संचालकांच्या कक्षात फेकली शाई, संतप्‍त विद्यार्थ्‍यांचे कृत्‍य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चुकीचे मूल्यांकन होऊन गुण कमी मिळाल्याने संतप्त झालेल्या अज्ञात विद्यार्थ्यांनी गुरुवारी परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. जे. डी. वडते यांच्या कक्षात तोडफोड करून शाईचे मडके फोडले. 
 
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात येऊन काही अज्ञात विद्यार्थ्यांनी परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. जे. डी. वडते यांच्या कक्षात धुमाकूळ घातला. मातीच्या मडक्यामध्ये काळ्या रंगाची शाई भरून मडके संचालकांच्या कक्षात फोडले. त्यामुळे संपूर्ण कक्षात काळी शाई पसरली. टेबलवरील कार्यालयीन कागदपत्रे खराब झालीत. याशिवाय तेथील सूचनांची पाटी काढून खाली फेकून दिली. काही विद्यार्थ्यांच्या निकालात गुणदान कमी झाल्याची काही प्रश्न अनुत्तरीत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केल्या. तक्रारीच्या अनुषंगाने परीक्षा विभागाकडून चौकशी सुरू आहे. 
 
याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांनी चुकीचे मूल्यांकनाचा आरोप करून डॉ. वडते यांच्या कक्षात तोडफोड करून शाई फेकली. या वेळी अर्वाच्य भाषेत डॉ. वडते यांना धमकी देण्यात आली. याबाबत बोलताना डॉ. वडते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी सुरू असून एक-दोन दिवसात प्रत्यक्ष वस्तुस्थिती समोर येईल. परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक यांनी नियमानुसार परीक्षकांना बोलावून त्यांच्याकडून परीक्षणाचे कार्य केलेले आहे. या बाबीशी परीक्षा संचालकांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. असे असून सुद्धा दोषारोपण करणे चुकीचे आहे. याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणणे, शासकीय कक्षाची नासधूस करणे हा गुन्हा असून त्या संदर्भात कुलसचिवांनी फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...