आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक उपायुक्तांच्या कक्षात विद्यार्थ्यांनी दिला ठिय्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तीन महिन्यांपासून कोणताही भत्ता मिळाल्याने आक्रमक झालेल्या निंभोरा येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते यांच्या कक्षात सोमवारी (४ एप्रिल) बैठा सत्याग्रह केला.
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी बडनेरा मार्गावरील निंभोरा येथे विभागीय वसतिगृह उभारण्यात आले आहे. एकूण पाच युनिट मिळून एक हजारच्या आसपास विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. आर्थिक दुर्बल घटकातून येत असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भत्ता वेळेवर मिळणे गरजेचे आहे. याच भत्त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत मिळते. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहत शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य होते. मात्र, तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे पैसे रखडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमण संघटनेचे अॅड. सुनील गजभिये यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय भवनावर धडक दिली. प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते यांच्या कक्षात विद्यार्थ्यांनी बैठा सत्याग्रह केला. निर्वाह भत्ता, ड्रेसकोड, प्रोजेक्ट, सहल इतर साहित्य आदी खर्चाचे पैसे मिळाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत पैसे मिळत नाही, तोपर्यंत बैठा सत्याग्रह करणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. या वेळी शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.