आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Attempted Suicide In Independence Day Program

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच विद्यार्थ्यांनी घेतले किटकनाशक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरू असताना बारावीच्या चार विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर कीटकनाशक घेऊन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यात घडली. प्राथमिक सुविधा पुरविण्यात महाविद्यालयाकडून टाळाटाळ होत असल्याने विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दामपूर मोहदा येथील विठ्ठलराव जाधव कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरू असताना हा प्रकार घडला. ध्वजारोहणानंतर या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गीत सादर करण्याची परवानगी मागितली होती. ती देण्यात आल्यावर चौघेही मंचावर आले. त्यांनी सर्वांसमक्ष कीटकनाशक प्राशन केले. उपस्थितांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. अाता या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी सांगितले की, महाविद्यालयाचे व्यवस्थापन सातत्याने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. महाविद्यालयात दर्जेदार शिक्षकांसह चांगली प्रयोगशाळाही उपलब्ध नाही. याशिवाय शिष्यवृत्तीचे पैसेही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.