आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Contribute Development Of Society Guardian Minister Pote

विद्यार्थ्यांनी समाजाचा उत्कर्ष साधावा - पालकमंत्री प्रवीण पोटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टी बाळगून स्वत:चा समाजाचा उत्कर्ष साधावा, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. अमरावतीच्या लोकशिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीराम महाविद्यालयाच्या नुकत्याच पार पडलेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर लोकशिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जवंजाळ, उपाध्यक्ष जे. व्ही. महल्ले, प्राचार्य प्रवीण दिवे, सीमा जवंजाळ, शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड आदी उपस्थित होते.

प्रगतीच्या अमर्याद संधी साधने इंटरनेट या जलद दळणवळणाच्या माध्यमातून जवळ आली आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती प्रचंड गुणदान करुन कृत्रिमरित्या फुगविण्याचे काम शाळांकडून होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे, ही बाब प्रकर्षाने शिक्षकांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोजगाराभिमुख शिक्षणाकडे वळणे आवश्यक असून पारंपरिक शिक्षणापेक्षा जगाचा जागतिक बाजाराचा कल कशाकडे आहे, याचे सुक्ष्म निरीक्षण करुन शिक्षण घेतल्यास कुणीच बेरोजगार राहणार नाही,असे पालकमंत्र्यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते ‘संवाद’ या वार्षिकांकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाला शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीराम कॉलेजच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री पोटे.