आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीएसईप्रमाणे जि. प. शाळेत तयार होणार ‘अध्ययन फोल्डर’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पालकांनाविद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कळावी म्हणून सीबीएसई प्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अध्ययन फोल्डर तयार केले जाणार आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती त्यांच्या पालकांना प्राप्त होणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती आहे. 


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वतंत्र अध्ययन फोल्डर तयार केले जाते. प्रत्येक चाचणीनंतर पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख शाळांकडून तयार होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासाबाबत पालकांना या फोल्डरमधून माहिती मिळण्यास मदत होणार आहे. देशातील शाळांच्या तुलनेत राज्यातील पाचवीच्या ४६.५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या धडे वाचता येणे. आठवीतील ३२.९ टक्के विद्यार्थी भागाकाराची उदाहरणे सोडवू शकतात. तर त्याच वर्गातील २२.८ टक्के विद्यार्थी इंग्रजीतील शब्द वाचू शकतात. असे ‘प्रथम’कडून जानेवारी २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले होते. त्रयस्थ संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणात प्राथमिक शिक्षणात महाराष्ट्र मागे जात असल्याची बाब समोर आली होती. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान लेखन वाचन येणे गरजेचे आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती करीता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे आरंभ केले. 


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान आरंभ करीत प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासली जात आहे. पहिली ते आठवी मधील प्रत्येक विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी तर नवव्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेतली जात आहे. शिवाय ऑनलाइन प्रणालीतून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती शालेय शिक्षण विभागाकडून गोळा केल्या जात आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाला गती देण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमातून शाळांची अध्ययन क्षमता तपासण्यात आली. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यातील ३५ हजार शाळा दर्जा प्राप्त केला. ६२ हजार शाळांना अध्ययन क्षमतेत दर्जा प्राप्त केला. अद्याप ५२ हजार शाळांची प्रगती होणे बाकी आहे. 


शंभर टक्के अध्ययन 
अध्ययनक्षमतेत दर्जा प्राप्त करणाऱ्या शाळांची संख्या एकूण शाळांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानासह सीबीएसई प्रमाणे विद्यार्थ्यांचे अध्ययन फोल्डर तयार करणार असल्याची माहिती आहे. 


निर्णय विचाराधीन 
जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांचे अध्ययन फोल्डर करण्याबाबत निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. राज्य विद्या प्राधिकरण संचालकांकडून कार्यशाळेत याबाबत सूचना दिल्या आहेत. 
- चंदनसिंग राठोड, शिक्षण उपसंचालक अमरावती 

बातम्या आणखी आहेत...