आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०० % अनुदानित शाळांसाठी शिक्षकांमध्ये लागली चढाओढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन प्रक्रिया १४ सप्टेंबरला राबवली जाणार आहे. स्थानिक केंद्रिय बस स्थानक जवळील सायन्सस्कोर स्थित जिल्हा परिषद (माध्य. शाळा) बॉईज हायस्कूल येथे सकाळी पासून ही प्रक्रिया होणार आहे. शिक्षक आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या ११ ऑगस्ट १६ च्या आदेशानुसार खासगी संस्थांमधील अनुदानित शाळेतील शिक्षकांचे समायोजन केले होणार आहे. सर्व अतिरिक्त शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक रिक्त पदे असणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकांनी यावेळी उपस्थित राहणे गरजेचे आहे. रिक्त जागा अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी आज (१२ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालय तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. अंतिम यादी प्रमाणे अतिरिक्त शिक्षकांना समायोजन स्थळी उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापकांनी कार्यमुक्त करावे, असे निर्देश शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड यांनी दिले. अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिये दरम्यान गैरहजर राहिल्यास शिक्षण विभागाकडून पदस्थापना दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. संच मान्यता करणे गरजेचे होते. मात्र शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाकडून अनेक शिक्षकांना यामध्ये डावलण्यात आल्याचे वास्तव समोर आले होते. शिवाय काही संस्थांकडून तर माहिती देखील दडविण्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी माहिती लवपिणाऱ्या संस्थेतील शाळांची संच मान्यता करवून घेतली.
ऑनलाइनसमायोजन : खाजगीशाळांची संच मान्यता करण्यात आल्यानंतर २३४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहे, तर २२७ जागा रिक्त आहेत. अतिरिक्त ठरलेल्या २३४ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवार १४ सप्टेंबरपासून तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्याकरिता वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
शंभरटक्के अनुदानित शाळेत समायोजन व्हावे म्हणून संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमध्ये चढाओढ सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वीस टक्के अनुदान मिळालेल्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची अनुदानित शाळेत समायोजन व्हावे म्हणून स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे समायोजन प्रक्रिये दरम्यान अनेक शिक्षकांचे हेवे-दावे समोर येण्याची शक्यता आहे.

खासगी शाळांमधील संचमान्यतेची प्रक्रिया माध्यमिक शिक्षण विभागाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील ४१ शाळा नव्याने शासनाच्या २० टक्के अनुदानावर आल्या आहेत. संचमान्यतेमध्ये या शाळांमधील शिक्षक देखील अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांच्याकडून शंभर टक्के अनुदानित शाळेमध्ये समायोजनाचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय शंभर टक्के शाळांवरील शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांच्याकडून नामांकित शाळेत समायोजन होण्या बाबत प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी घोषित करण्यात आल्यानंतर शिक्षकांमधील ही चढाओढ आणखी वाढणार आहे. जिल्ह्यातील ५०२ खासगी शाळांमधील तब्बल २३४ शिक्षक अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची जबाबदारी शिक्षण विभागावर आली आहे. विद्यार्थी पट संख्येच्या आधारे शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांमधील संच मान्यता करण्याबाबत शिक्षण संचालनालयाकडून आदेश देण्यात आले होते. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना ही संच मान्यता ऑनलाइन प्रणालीद्वारे करणे गरजेचे होते. मात्र संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील शिक्षकांना वाचविण्याच्या प्रयत्नात संचमान्यतेत अत्यंत गंभीर चुका मुख्याध्यापकांकडून करण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...