आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरू झाल्या उन्हाच्या झळा, आता आरोग्य सांभाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान ३८ अंशावर गेल्याने आगामी काळात उष्णतेच्या प्रखर झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यामुळे उन्हात बाहेर फिरणाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेऊन आरोग्य जपण्याची गरज आहे. 
 
उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी तहान लागलेली नसली तरीही जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, जोडे चपलाचा वापर करावा, प्रवासात पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान आणि चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदींपासून उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करण्यात यावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करणे आवश्यक आहे. 
 
उन्हात शक्यतो हे टाळावे 
दुपारीबारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे, उन्हाच्या वेळेत शक्यतो स्वयंपाक करू नये.
बातम्या आणखी आहेत...