आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नेस्ले’च्या महिला कर्मचारी तरुणीचा संशयास्पद मृत्यू, नागपुरातील हाॅटेलमध्ये आढळला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपुरातील प्रसिद्ध ‘प्राइड हॉटेल’मध्ये मुंबईतील एका तरुणीचा  संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. अलका वळंजू (२८, रा. पनवेल) असे मृत तरुणीचे नाव आहे. या गूढ मृत्यूची चाैकशी पाेलिसांकडून केली जात अाहे.
 
मृत अलका या नेस्ले या  बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होती. कंपनीच्या कामानिमित्त मंगळवारी ती मुंबईहून नागपुरात आली होती. काम आटोपल्यानंतर ती  प्राइड हॉटेलमध्ये गेली होती. बुधवारी सकाळी तिच्या आई-वडिलांनी अनेकदा तिला फोन केला. मात्र, तिने काही प्रतिसाद  दिला नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी नेस्ले कंपनीतील कर्मचाऱ्यांना फोन केला. त्यांनीही हॉटेलमधील तिच्या रूममध्ये फोन केला. मात्र, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या किल्लीने रूमचा दरवाजा उघडला. त्या वेळी  बेडवर अलका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.  तिच्या तोंडाला फेस आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.