आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, कर्जमाफीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे देवेंद्र भुयार यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी - दिवाळीपर्यंत शासनाने संपूर्ण शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. 
 
भाजप सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. निवडणुकीपूर्वी युती करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांचा ७/१२ पूर्ण कोरा करा , स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी पूर्ण करा, केंद्राचे शेतकऱ्यांचे आयात निर्यात धोरण स्पष्ट करा, आदी विविध शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप सरकारसोबत युती केली होती. परंतु सत्ता येऊन साडेतीन वर्षे लोटूनसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न कायम राहिले आहे . शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण मात्र वाढलेले दिसून येत आहे . त्याचबरोबर कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांचा घात केलेला आहे . या कर्जमाफीमध्ये विदर्भातील १० ते १५ टक्के शेतकरी पात्र ठरणार असून, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक शासनाने केलेली आहे . त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांनी सत्तेतून बाहेर पडल्याची घोषणा केली. 

वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीसुद्धा पदाचा राजीनामा दिला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये प्रलंबित असणारे सिंचन प्रकल्प पंढरी प्रकल्प , भेमडी प्रकल्प , दाभी प्रकल्प , पाक प्रकल्प , महादेव खोरी प्रकल्प , लाडकी प्रकल्प या सर्व प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करावे आणि २००१५ ते २०१७ पर्यंत काढलेला पीक विमा शेतकऱ्यांना अनुदान म्हणून द्यावा, शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून त्यांना मिहानसारख्या कंपन्यांमध्ये सामावून घ्यावे, आदी प्रमुख मागण्या असून, त्या साडेतीन वर्षे होऊनही पूर्ण होऊ शकल्या नाही. या मागण्या शासनाने दिवाळीपर्यंत पूर्ण केल्यास त्यांना दिवाळी साजरी करू देणार नसल्याचे भुयार यांनी सांगितले. यावेळी विनोद ठोके , रवींद्र पाटील , सुनील केचे , रुपेश राऊत , प्रदीप इंगळे यांच्यासह आदींची उपस्थित होती. 
बातम्या आणखी आहेत...