आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरूपानंद म्हणाले- मराठा आरक्षण मतांसाठी, पाकिस्तानशी आरपारची लढाईच हवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘आता बस झाले. पाकिस्तानचे लाड आता पुरे झाले. भारताने आता पाकिस्तानशी आरपारची लढाई केली पाहिजे’, असे स्पष्ट मत द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे यापूर्वीच उद‌्ध्वस्त करायला हवे होते. आताही वेळ गेलेली नाही. पंतप्रधानांनी युद्धाची संपूर्ण तयारी करून पाकवर हल्ला करावा’, असे स्वरूपानंद म्हणाले. अयोध्येत भाजपाने मशिदीचा नव्हे तर मंदिराचा ढाचा पाडण्याचे काम केले. येथे शंकराचार्य असुरक्षित आहे. मात्र मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंना संपूर्ण सुरक्षा प्रदान केली जाते, असा आरोपही त्यांनी केला. मात्र त्याचवेळी आपण मोदी विरोधक नाही, अशी मखलाशीही त्यांनी केली. नवयुवक हीच आपली शक्ती असल्याचे पंतप्रधान सांगतात. परंतु पंजाबातील युवक नशेच्या आहारी जाऊन वाया जात आहे. एवढेच कशाला महिलाही मोठ्या प्रमाणावर नशा करीत आहे. युवकांनी आधी व्यसनाधिनता सोडावी. तरच पंतप्रधानांचे हात बळकट होईल, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण मतांसाठी
देशातून आरक्षण संपुष्टात आणायला हवे असे सांगतानाच राज्यात मराठा आरक्षणाची मागणी केवळ व्हाेट बँकेसाठी असल्याची टीका स्वरूपानंद सरस्वती यांनी केली. प्रत्येकाला आरक्षणानुसार नव्हे तर योग्यतेनुसार संधी द्यायला हवी, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...