आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरणात अजिंक्यपदासाठी खेळाडूंमध्ये चुरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मुलांच्या १४ वर्षांखालील १०० मी. फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात इंडो पब्लिक स्कूलच्या अथर्व हिंगेमिरेने मि. २०.३७ सेकंद वेळ काढून अजिंक्यपद पटकावले. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या सारस अंबाडेकरला मि. २९.२२ सेकंद वेळेसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर तोमोए इंग्लिश स्कूलच्या आयुष तिरमवारने मि.३८.१२ सेकंद वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले.
जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद अमरावतीतर्फे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावावर आयोजित या स्पर्धेत मुलींच्या १४ वर्षांखालील १०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात तोमोय इंग्लिश स्कूलच्या युगंधरा गवळीने मि.०५.६६ मि. वेळ काढून अजिंक्यपद पटकावले. इंडो पब्लिक स्कूलच्या सानवी गुप्ताने मि. २३.२८ सेकंद वेळेत दुसरा तिची सहकारी अध्यात्मिका मोदीने मि.२४.८५ सेकंद वेळेत तिसरा क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटातील याच प्रकारात फातिमा काॅन्व्हेंटच्या अंशोदीप ढोरेने मि.२४.०९ सेकंद वेळ काढून बाजी मारली तर त्याचा सहकारी आदित्य घाटेने मि.४०.५० सेकंद वेळेत दुसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या विभागात इंडो पब्लिकच्या आर्या डाहाकेने मुलांच्याही तुलनेत वेगवान मि.४८.५७ सेकंद वेळ काढून विजेतेपद पटकावले. तिची सहकारी इशा जयसिंगपुरेने मि.५०.५९ सेकंद वेळेत दुसरे स्थान बळकावले.

या स्पर्धेत समन्वयक क्रीडा अधिकारी अनिल बोरवार यांच्यासह डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, डाॅ. योगेश निर्मळ, प्रतिमा भोंडे आणि मंगेश व्यवहारे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
५०मीटरमध्ये हषित, अध्यात्मिकाला जेतेपद: मुलांच्या१४ वर्षांंखालील ५० मी. फ्रीस्टाईल जलतरणात इंडो पब्लिकच्या हषित चोरडियाने ३५.२८ सेकंद वेळ काढून प्रथम, पोदार इंटरनॅशनलच्या सरस उंबरीकरने दुसरा तर तोमोयच्या आयुष तिरमवारने ितसरा क्रमांक बळकावला.
बातम्या आणखी आहेत...