आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेवर तलवारीने हल्ला, शुभेच्‍छा देण्‍यासाठी गेली होती घरी सासरघरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पतीपासून विभक्त राहणारी पत्नी ईद निमित्त पतीला शुभेच्छा देण्यासाठी गेली असता तिच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि. २७) सकाळी दहा वाजताच्या सुमारास यास्मीन नगर येथे घडली.
 
नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शाहेदा बानो (वय ३०) ही विवाहिता मागील तीन वर्षांपासून पती शेख सादिक यांच्यापासून विभक्त राहते. दरम्यान मंगळवारी शाहेदा बानो ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी पतीच्या घरी गेली होती. यावेळी आरोपी आबेदा, पती शेख सादिक, हमीदा, सलमान, नसीम, शाहीद, तय्यब सर्व रा. यास्मीन नगर तु घरी का आली असे म्हणून शाहेदाबानो यांना मारहाण केली. दरम्यान शाहीद याने शाहेदा बानो त्यांच्या भावावर तलवारीने हल्ला केला. नागपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...