आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यामध्ये तीन हजार तलाठी सज्जे वाढणार; मंत्रिमंडळाकडे लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- तलाठी सज्जा महसूल मंडळांची फेररचना करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशी राज्य सरकारने तत्वत: स्वीकारल्या अाहेत. या शिफारशीनुसार राज्यात ३०८३ तलाठी, ३,६०० कोतवाल आणि ५१४ मंडळ अधिकाऱ्यांची पदे नव्याने निर्माण होणार असल्याची माहिती नागपूरचे िवभागीय आयुक्त समितीचे अध्यक्ष अनुपकुमार यांनी अनौपचारिक चर्चेत दिली. मात्र अहवालाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून करायची या बाबतचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नव्याने पुनर्रचना करताना सहा तलाठी सज्जामागे एक मंडळ अधिकारी हा निकष कायम ठेवण्यात आला आहे. मंडळ अधिकारी कार्यालयाकरीता एक स्वतंत्र कोतवाल, मंडळ अधिकाऱ्याला स्वतंत्र कार्यालय तसेच सर्व अभिलेखांची एक दुय्यम प्रतीची मंडळस्तरावर उपलब्धता हे निकष कायम ठेवण्यात आले अाहेत.


समितीने सरकारला काही महत्वपूर्ण शिफारशीही केल्या आहे. मंडळ अधिकाऱ्यांची कार्यालये सक्षम करणे आवश्यक अाहे, त्यामुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी हाेईल, असे अायुक्त म्हणाले. या शिफारशी स्वीकारल्यास कोकण विभागात १२२, नाशिक १०९, पुणे ७५, अौरंगाबाद १०६, नागपूर ५९ अमरावती विभागात ०५ अशी एकूण ५१४ मंडळ अधिकाऱ्यांची पदे वाढतील. राज्यात पूर्वी २०९३ महसूल मंडळे होती. त्यात नव्याने २५६९ होईल, असे ते म्हणाले.