आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या तक्रारी करा; एचएमचा अजब फतवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शिक्षकां विरोधात तक्रारी करण्यासाठी मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना चिथावणी दिली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शैक्षणिक कार्य सोडून अंतर्गत राजकारणात विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याचा प्रकार न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेत घडत असून पालकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
वर्गात शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांविरूद्ध माझ्याकडे लेखी तक्रारी करा, असे फर्मान मुख्याध्यापक गजानन श्रीनाथ यांनी काढले आहे. वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकाविरोधात तक्रारी करण्याचे सांगितले जात असल्याने विद्यार्थ्यांनी चीड व्यक्त केली आहे. न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेचे मुख्याध्यापक गजानन श्रीनाथ यांनी गुरूवार सप्टेंबरला शाळेतील विद्यार्थांसाठी एक सूचना प्रसारित केली. या सूचनेत त्यांनी, तुम्हाला शिकविणारे शिक्षक-शिक्षिका वर्गात वेळेवर येत नसतील, पाठ व्यवस्थित शिकवित नसतील, शारीरिक अथवा मानसिक छळ करीत असतील, कारण नसताना रागवत असतील, खाेटे बाेलायला शिकवित असतील, अशा शिक्षक -शिक्षकांविरूद्ध मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्याबाबत सुचविण्यात आले. ही सूचना वर्गात वाचल्यानंतर शिक्षक -शिक्षकांविरूद्ध तक्रारी करायला भाग पाडणाऱ्या मुख्याध्यापकाच्या कृती विरोधात विद्यार्थ्यांनी तत्काळ चीड व्यक्त केली. या शाळेचा निकाल उत्तम असून काेणत्याही शिक्षक-शिक्षिकेबद्दल विद्यार्थी, पालकांची तक्रार नसल्याचे चित्र आहे. सूचना मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी हा प्रकार पालकांना सांगितला. मागील अनेक वर्षांपासून या शाळेतील शिक्षकांना आेळखणाऱ्या पालकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. एका पालकाने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून मुख्याध्यापक शिक्षक यांच्यात वाद सुरू आहे. या वादात मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. पाेलिसांनी छेडछाड विरोधी माेहीम अंतर्गत या शाळेत लावलेल्या तक्रार पेटीत शिक्षक-शिक्षिकांच्या तक्रारी टाका, असे मुख्याध्यापकांनी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थांना वारंवार जाहीरपणे सांगितले हाेते, त्यानंतर कालच्या सूचनेमुळे विद्यार्थ्यांच्या काेवळ्या मनात शिक्षिकांविरूद्द विष कालविणारे मुख्याध्यापक विद्यार्थांना काेणता मार्ग दाखवीत आहेत,असा प्रश्न पालकांनी केला आहे. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा वापर करीत आहेत. या विरोधात मुख्याध्यापकांविरूद्ध संस्था संचालक, शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांनी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...