आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेत गणित, सायन्स शिकवायला शिक्षक नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुणवत्तावाढीचा दावा करणाऱ्या नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेतील दहावीच्या विद्यार्थांना गेल्या दोन महिन्यांपासून गणित, सायन्स संस्कृत विषय शिकवायला शिक्षकच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचा ढोंगीपणा जगासमोर आला आहे.
न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेच्या सुरस कथा बाहेर येत असून, नूतन विदर्भ मंडळाने दै. दिव्य मराठीला दिलेल्या खुलाशात गुणवत्तावाढीचा संस्था प्रयत्न करीत असल्याचे दावा केला होता.मात्र, वास्तव परिस्थिती अत्यंत विपरित असून, न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेतील गणित शिक्षक हेमंत नामजाेशी काविळीने गंभीर आजारी असून, गेल्या दाेन महिन्यांपासून ते आजारी रजेवर आहेत.शाळेतील संस्कृत विषयाच्या शिक्षिका प्रतिमा जाहागीरदार ३१जुलै राेजी सेवानिवृत्त झाल्या आहेत.

हेमंत नामजाेशी इयत्ता दहावीला गणित सायन्स विषय शिकवितात तर संस्कृत शिक्षिका प्रतिमा जहागिरदार इयत्ता आठवी ते दहावी वर्गांना संस्कृत विषय शिकवित हाेत्या.नामजाेशी आजारी रजेवर जहागिरदार सेवानिवृत या परिस्थितीमुळे नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेच्या मुख्याध्यापकांचा संशयास्पद आर्थिक व्यवहार उघडकीस आला असून, या विषयी संस्थेने सत्य जगासमोर मांडले पाहिजे. न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेचे मुख्याध्यापक गजानन श्रीनाथ शाळेतील शिक्षक अरूण भारती यांच्या नावाने भारतीय स्टेट बँक, रूख्मिीणीनगर शाखा येथे संयुक्त खात्यात व्यवहार सुरू आहेत.३२८१६४२३१७२ या क्रमांकाच्या खात्यावर माेठे आर्थिक व्यवहार झाले असून, या व्यवहारातील रक्कम काेणाची,याबाबत संशय निर्माण झाला आहे. काेणत्याही शाळेच्या मुख्याध्यापकाला बँकेत खाते काढायचे असेल तर त्यासाठी शाळा समितीचा ठराव करावा लागताे.शाळा समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक असे संयुक्त खाते काढण्याची कायदेशीर तरतूद आहे.मात्र,या प्रकरणात खाते उघडण्याचा कुठलाही ठराव शाळा समितीने केला नाही.आर्श्चयाची बाब म्हणजे शाळेतील शिक्षकासाेबत मुख्याध्यापकाने संयुक्त खाते काेणत्या हेतूने उघडले असेल,याची चौकशी हाेणे क्रमप्राप्त आहे. जी. बी. श्रीनाथ ए. डी. भारती या नावाने असलेल्या संयुक्त खात्यातील व्यवहार कसे झालेत,काेणी केलेत या प्रश्नांची उकल झाल्यास माेठा गैरव्यवहार बाहेर येऊ शकते,अशी चर्चा शिक्षण मंडळात सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...