आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडेंनी नाकारली दुप्पट वेतनवाढ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आमदारांना दुप्पट वेतनवाढ करणाऱ्या फडणवीस सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करत ही वाढीव वेतनवाढ न स्वीकारण्याचा निर्णय अमरावतीचे शिक्षक अामदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आहे. ‘उपाशीपोटी विद्यादानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना वेतन अनुदान मिळेपर्यंत ही वाढीव वेतनवाढ स्वीकारणार नाही,’ असेही त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

विधान परिषद सभापतींना याबाबत पाठवलेल्या पत्रात देशपांडे यांनी म्हटले अाहे की, वेतनवाढीची मागणी अाम्ही कधीही केली नव्हती. मात्र अधिवेशनात चर्चेविनाच हा ठराव घेत दुप्पट वेतनवाढीचा ठराव मंजूर झाला. काहीही लक्षात येण्यापूर्वी आणि भूमिका मांडण्याची संधी देण्याअाधीच हा निर्णय झाल्याचे मला दु:ख वाटते. १५ वर्षांपासून विनाअनुदानित शाळांतील पात्र शिक्षक वेतनाची प्रतीक्षा करत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...