अमरावती - तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातून तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पदवीधर मतदारांच्या अर्जावरील मोबाईल क्रमांक चोरताना माजी अधिकारी लतीश देशमुख यांना बुधवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी नायब तहसीलदार रमेश इंगोले कनिष्ठ लिपिक शिंदे यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. पदवीधर मतदारांचे अर्ज भरून घेण्यासाठी काही दिवसांपुर्वी जिल्हा परिषदेच्या एनएचएम विभागात मोठ्या प्रमाणात अर्ज आढळून आले होते. या घटनेची शाई वाळत नाही तोच आजची घटना घडल्यामुळे विविध चर्चेला उत आला आहे.
आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष उमेदवारांकडून रणनिती आखण्यात येत आहे. यासाठी संभाव्य उमेदवाराच्या प्रचारालाही सुरवात झाली आहे. निवडणुकीसाठी कमी कालावधी उरल्यामुळे बहुतांश उमेदवारांचा कल मोबाईल क्रमांक मिळवून त्याद्वारे करण्याकडे दिसून येत आहे. यासाठी मतदारांचे अर्ज भरून घेण्यापासून प्रचार करण्यापर्यंतची कामे जोमात सुरू आहे. निवडणुकीसाठी अत्यल्प कालावधी शिल्लक असल्यामुळे उमेदवारांचा कल हायटेक प्रचाराकडे दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून मनपाचे माजी अधिकारी डॉ. लतीश देशमुख दुपारच्या सुमारास येथील तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाच्या कार्यालयात मतदारांच्या अर्जाचे गठ्ठे आणून त्यावरील मोबाईल क्रमांक नोंदवून घेत असल्याचे युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. देशमुख पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही बाब तहसीलदार सुरेश बगळे यांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, बगळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक विभाग गाठला चौकशी सुरू केली. दरम्यान, देशमुख यांनी नियमानुसार मोबाईल क्रमांक मिळवण्यासाठी कायदेशीर अर्ज तहसीलदार किंवा एसडीओ यांच्याकडे करणे अपेक्षित होते. परंतु देशमुख यांनी याबाबतचा अर्ज नायब तहसीलदार यांच्याकडे दिला होता. त्यानुसार रमेश इंगोले यांनी संबंधित अर्जावर कनिष्ठ लिपिक शिंदे यांच्याकडे याची जबाबदारी सोपवून मोबाईल क्रमांक नोंदवण्यास मतदारांचे गठ्ठे उपलब्ध करून देण्यास संमती दिली होती. त्यानुसार देशमुख खासगी दोन नागरिकांच्या मदतीने गठ्ठे काढून नाव क्रमांक नोंदवून घेत होते. ही बाब युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उर्वरित.पान
निवडणूक विभागात मतदारांचे नाव मोबाइल क्रमांक नोंदवून घेताना रंगेहात सापडल्यानंतर लतीश देशमुख यांची चौकशी केली.